Homeधार्मिककपालेश्वर मंदिर श्रावणी शनिवार व सोमवारी पहाटे ४ वाजताच उघडणार !

कपालेश्वर मंदिर श्रावणी शनिवार व सोमवारी पहाटे ४ वाजताच उघडणार !

– श्रावण मासानिमित्त भाविकांची गर्दी उसळणार…

– मंदिराला केली आकर्षक विद्युत रोषणाई…

– पंचवटी पोलिसही झाले सज्ज…

पंचवटी – विशेष प्रतिनिधी
श्रावण मासानिमित्त शिवभक्तांना दर्शन घेण्यासाठी, सोमवार आणि शनिवारी कपालेश्वर मंदिर पहाटे ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार असल्याची माहिती प्रशासक विलास पाटील यांनी दिली. श्रावण महिना सुरू झाल्याने शहर परिसरातील महादेव मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून पंचवटीतील श्री कपालेश्वर महादेव मंदिरात देखील श्रावणानिमित्त मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे.मंदिराची स्वच्छता करून मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून दरवर्षी प्रमाणे होणारी गर्दी लक्षात घेता यंदाही भाविकांच्या सुरक्षेच्या आणि सुरळीत दर्शनाच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. 

प्रशासक विलास पाटील

प्रशासक विलास पाटील

श्रावण मासानिमित्त कपालेश्वर महादेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात सोमवार-शनिवार कपालेश्वर मंदिर पहाटे ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार असून, इतर दिवशी पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत उघडे रहाणार आहे. तसेच महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा करण्यात येणार असून बॅरिकेडससह १०० हून अधिक स्वंयसेवकदेखील तैनात राहणार आहेत.

याच बरोबर पंचवटी पोलिस ठाण्याच्या वतीने पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. श्रावणी सोमवार, श्रावणी शनिवार या दिवशी मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या लाखांहून अधिक मोठ्या प्रमाणावर असते. या दरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण होवू नये यासाठी कपालेश्वर महादेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण श्रावण महिना तसेच गणेशोत्सवापर्यंत मंदिरासह परिसरात विद्युत रोषणाई राहणार आहे.

एकवीस दांपत्यांकडून होणार पूजा

श्रावण मासाच्या पहिल्या श्रावणी शनिवारी कपालेश्वर एकवीस दांपत्यांकडून पूजा करण्याची परंपरा आहे. त्यानुसार कपालेश्वर मंदिरात सत्यशंकर पूजेचे आयोजन करण्यात आले आहे या पूजेसाठी एकवीस दांपत्य पूजेसाठी बसणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!