Homeशहर व जिल्हाबंगाली कारागिराने लावला लॉटरी विक्रेत्यांना चुना; दागिन्यांऐवजी तिकिटांवर कलाकुसर

बंगाली कारागिराने लावला लॉटरी विक्रेत्यांना चुना; दागिन्यांऐवजी तिकिटांवर कलाकुसर

नाशिक – विशेष प्रतिनिधी
अंगी असलेल्या गुणांचा सदुपयोग करण्यापेक्षा त्याचा दुरुपयोग करून स्वतःचे उखळ पांढरे करणारे अनेक महाभाग समाजात आपल्या अवतीभोवती वावरत असतात. असाच एका महाभागाचा अनुभव शहरातील लॉटरी विक्रेत्यांनी घेतला असून बेमालूमपणे लॉटरी तिकिटावर विशिष्ट अंक चिटकवून ‘विनिंग’ ची रक्कम खिशात घालण्याचा प्रकार समोर आला आहे. या भामट्यास लॉटरी विक्रेत्यांनी चोप देत वसूली चालवली आहे.

लॉटरी व्यवसायात विविध राज्यांची तिकिटे विक्रीस असतात. त्या तिकिटांद्वारे अनेक शौकीन आपले नशीब कसे उघडेल या अपेक्षेत असतात. झटपट व बुकींगवर मर्यादा आल्याने या लॉटरीला तसा चांगला प्रतिसाद लाभत आहे. याच व्यवसायात नागालँड सरकारची ‘डियर’ नावाची लॉटरी असून तिचे दिवसभरात तीन ‘ड्रॉ’ निघतात. एका तिकिटाची किंमत सहा रुपये असून शेवटचे चार नंबर जुळले तर ग्राहकास १२० रुपये मिळतात.

लॉटरी खेळणाऱ्या अनेक ग्राहकांपैकी एकाने वेगळीच शक्कल लढवत विक्रेत्यांकडून पैसे लुटण्यास सुरूवात केली. हा महाभाग सराफ बाजारातील बंगाली कारागीर असून दागिने घडवण्याचे कौशल्य त्याने भलत्याच कामासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. लॉटरीच्या तिकिटावरील शेवटच्या चार आकड्यांपैकी एक नंबर दुसऱ्या तिकिटावरून कापून घेत चिटकावयचा. हे काम इतके बेमालूम असायचे की लॉटरी विक्रेत्यांना त्याची खबरही लागायची नाही. प्रत्येक विक्रेत्याला हा महाभाग ‘विनिंग’ चे प्रत्येकी पाच तिकिटे देऊन ६०० रुपये खिशात घालायचा. असे प्रकार त्याने शहरातील बऱ्याच लॉटरी दुकानांवर केले व हजारो रुपये उकळले.

लॉटरी विक्रेते ही तिकीटे ‘विनिंग’ म्हणून मुंबईतील मुख्य स्टॉकिस्ट पाठवायचे. परंतू इतकी ‘विनिंग’ तिकिटे कशी काय आली म्हणून बारकाईने तपासणी केली असता नाशिकमधील या भामट्याची हातचलाखी मुंबईतील स्टॉकिस्टच्या लक्षात आली. त्याने ही तिकिटे ‘विनिंग’ नसल्याचे नाकारत परत विक्रेत्यांना पाठवली तेव्हा या विक्रेत्यांना आपण गंडवले जात असल्याचे लक्षात आले. त्यांनी संबंधित खेळीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.

मेनरोडवरील एका दुकानात शनिवारी (दि. २६) हा ग्राहक पाच ‘विनिंग’ तिकीटे घेऊन आला. विक्रेत्याला ‘स्टॉकिस्ट’ कडून कळालेल्या फंड्यानुसार ही तिकिटे बोटाने तपासली असता त्यातील एक आकडा चिटकवण्यात आल्याचे लक्षात आले. पाचही तिकिटे तशी बनवलेली होती. त्यामुळे बंगाली कारागिरास पकडून जाब विचारण्यात आला. आपले पितळ उघडे पडल्याचे पाहून त्यालाही कबुली देण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तो भामटा पकडला गेल्याचे कळताच इतर विक्रेतेही आले. त्यांनी त्यास चोप देत आता बनावट तिकिटांनुसार वसूली चालू केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!