– महाराष्ट्र पोलिसांसाठी गौरवास्पद कामगिरी
– १९६१ पासूनचे पहिलेच सुवर्ण पदक
– पोलिसांची जागतिक स्तरावर मान उंचावली
नाशिक – विशेष प्रतिनिधी
सहायक निरीक्षक महेश गणपतराव हिरे यांनी बर्मिंगहम, अलाबामा, यु.एस.ए येथे पार पडलेल्या ‘२१ व्या जागतिक पोलीस आणि फायर स्पर्धा २०२५’ या स्पर्धेत १० मी. एअर पिस्टल शुटींग या प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त करून भारतीय पोलिसांची जागतिक स्तरावर मान उंचावली आहे.
दि. २६ जून २०२५ ते ०७ जुलै २०२५ या दरम्यान
झालेल्या स्पर्धेमध्ये ९० देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सन १९६१ पासून या खेळ प्रकारात पहिलेच सुवर्ण पदक असून महाराष्ट्र राज्य पोलीस दलासाठी ही अतिशय अभिमानाची व गौरवास्पद बाब ठरली आहे. 
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त (मुख्यालय) चंद्रकांत खांडवी, किरणकुमार चव्हाण (गुन्हे), श्रीमती मोनिका राऊत (परिमंडळ-१), किशोर काळे (परिमंडळ-२), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी सहायक निरीक्षक महेश हिरे यांना जागतिक स्तरावर नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविल्या बद्दल त्यांचे अभिनंदन व सत्कार करून प्रोत्साहन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य पोलीस शुटींग संघाचे कॅप्टन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण व उपनिरीक्षक सुदर्शन बोडके उपस्थित होते.

























