– मुंबईत मराठा ताकद एकवटली…
मुंबई – विशेष प्रतिनिधी
मराठा समाजाला ओबीसीला आरक्षण द्या, या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरु केले आहे. यावेळी लाखो मराठा बांधव मुंबईत एकवटला आहे. शांततेत आंदोलन करा…तोच मराठा बांधव अशी कळकळीची विनंती करताना जरांगे पाटील यांनी दुसरीकडे आता आझाद मैदान सोडणार नाही…..आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही हा खरखरीत इशारा सरकारला दिला आहे. आझाद मैदानावर हजारो मराठा बांधव सहभागी झाला असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, महापालिका मुख्यालयासह इतर परिसरात फक्त आणि फक्त मराठा आबालवृद्ध आंदोलक दिसत आहे.
आंदोलनाला पाच हजारांच्या उपस्थितीची अट घालण्यात आली असली तरी लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले असून आदोलकांचा ओघ मुंबईकडे सुरुच आहे. सकाळी १० वाजता आंदोलनाला प्रारंभ झाला असला तरी गुरुवारी सायंकाळपासूनच आंदोलकांनी मुंबईत पोहचण्यास सुरुवात केली होती. उपोषणस्थळी
गणेशाची स्थापना करून आंदोलानास प्रारंभ केला आहे. यावेळी आंदोलकांच्या गगनभेदी घोषणांनी आसमंत दुमदुमुन गेला होता.
उत्सव, पाऊस, कायदेशीर अडथळे आणि सरकारी नियंत्रण असे अनेक अडथळे पार करून हजारो आंदोलक मुंबईत पोहोचलेत. संपूर्ण देशाला या निमित्ताने मराठा एकजुटीचे दर्शन या मोर्चाने घडवले आहे. त्यातच जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत उपोषण स्थळ सोडणार नाही असा थेट इशाराच मनोज जरांगे यांनी दिल्याने राज्य सरकारसमोर आव्हान उभे ठाकले आहे. समाजाची मान खाली जाईल असं कुणी काही करू नका, असे जरांगे पाटील यांनी आंदोलकांना सांगितलं आहे. मुंबईकरांना त्रास होऊ देऊ नका असे आवाहनही जरांगे पाटील यांनी आंदोलकांना केले आहे. या आंदोलनाने मुंबईनगरी हळूहळू ठप्प होण्यास सुरुवात झाली आहे. या निमित्ताने मुंबई पोलिसांचीही परिक्षा लागणार आहे.
आंदोलकांची छायाचित्रे…
वे








वे


















