Homeक्रीडातिसरी राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा; नाशिकच्या केशिका पुरकरला सुवर्ण तर स्वरा...

तिसरी राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा; नाशिकच्या केशिका पुरकरला सुवर्ण तर स्वरा करमरकरला रजत पदक

नाशिक – क्रीडा प्रतिनिधी
नागपूर येथे झालेल्या तिसऱ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या केशिका पुरकर हिने सुवर्ण तर स्वरा करमरकर हिने १९ वर्षाखालील मुलींच्या गटात रजत पदक पटकावले. केशिका पुरकरचे पाठोपाठ झालेल्या तिसऱ्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस मानांकन स्पर्धेतील सलग तिसरे सुवर्ण पदक आहे तर स्वरा करमरकरचे या वर्षी झालेल्या तीन राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील चौथे पदक आहे. याच स्पर्धेत यश भंडारी याने १५ वर्षाखालील मुलांच्या गटाचे कांस्य पदक पटकावले.

१३ वर्षाखालील मुलींच्या गटात नाशिकच्या प्रथम मानांकित केशिका पुरकरची उपांत्य फेरीत तिची गाठ पडली ती ठाण्याच्या पाचव्या मानांकित जिनया वधान हिच्याशी केशिकाने जिनयाचा ९-११, ११-७, १२-१०, ११-३ असा ३-१ ने सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली अंतिम फेरीत केशिका पुरकरने ठाण्याच्या सहाव्या मानांकित धनश्री तरडे शी झालेल्या अटीतटीच्या लढतीत ९-११, ११-९, ११-९, ८-११, १२-१० असा ३-२ ने पराभव करून राज्य विजेतेपद पटकावत या गटातील हे तिसरे सुवर्ण पदक आपल्या नावे केले.

१९ वर्षाखालील मुलींच्या गटात स्वरा करमरकरचा उपांत्य फेरीत ठाण्याच्या दहावे मानांकन असलेल्या काव्या भटने ने ७-११, ११-६, १२-१०, ९-११, ११-६, १२-१० असा ४-२ ने पराभव केला. त्यामुळे स्वराला या गटात कांस्य पदक मिळाले.

१५ वर्षाखालील मुलांच्या एकेरीत नाशिकच्या यश भंडारी याची उपांत्यफेरीत गाठ पडली ती या स्पर्धेतील प्रथम मानांकित ठाण्याच्या निलय पाटेकरशी. यशचा त्याने ११-५, ११-६, ११-६ असा ३-० ने पराभव केल्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

या यशाबद्दल नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष शेखर भंडारी, सचिव राजेश भरवीरकर, कोषाध्यक्ष अभिषेक छाजेड, संजय वसंत, सतीश पटेल, अलका कुलकर्णी, अलीअसगर आदमजी, कोच जय मोडक, पुनीत देसाई, धनजय बर्वे, अजिंक्य शिंत्रे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.

फोटो कॅप्शन :-  केशिका पुरकर व स्वरा करमरकर समवेत प्रशिक्षक पुनीत देसाई

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!