Homeमहाराष्ट्रइगतपुरीत 'सीबीआय' चा छापा; बोगस कॉल सेंटर केले उद्ध्वस्त

इगतपुरीत ‘सीबीआय’ चा छापा; बोगस कॉल सेंटर केले उद्ध्वस्त

नाशिक – विशेष प्रतिनिधी
मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरीत बहुचर्चित रेन फॉरेस्ट रिसोर्टमध्ये भाडे तत्त्वावर जागा घेत सुरु असलेल्या बोगस कॉल सेंटरचा सीबीआय पथकाने ऑनलाईन फसवणुक आरोपाखाली
पर्दाफाश केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्यामधील पैसे उकळल्याचे उघडकीस आल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली. या कारवाईत सीबीआय पथकाने सात अलिशान गाड्यांसह १ कोटीहून अधिक रोकड, सोने, लॅपटॉप, मोबाईल आदि जप्त केले आहेत. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.

सायबर फसवणुकीविरोधात ८ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली. याअंतर्गत सहा आरोपींसह काही अज्ञात व्यक्ती तसेच बँक अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविरोधात एफआयआर नमूद करण्यात आली होती. ज्यामध्ये आरोप करण्यात आला आहे की, आरोपींनी काही अज्ञात व्यक्तींशी संगनमत करून अनेक लोकांची फसवणूक करण्याचा कट रचला, असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले होते. यासाठी त्यांनी ‘अमेझॉन सपोर्ट सर्विसेस’ नामक एक बोगस कॉल सेंटर बनवून त्यामार्फत संशयितांनी दिशाभूल करणारे कॉल करून लोकांची मोठी आर्थिक फसवणूक केली. 

या बोगस कॉल सेंटरमार्फत अमेरिका, कॅनडा तसेच अन्य देशांतील लोकांनाही गंडा घालण्यात आला. संशयित आरोपींनी त्यांच्याकडून गिफ्ट कार्ड्स तसेच क्रिप्टो करन्सी नावाखाली अवैध पैसे देखील उकळले. हे रॅकेट चालवण्यासाठी एकूण ६० ऑपरेटर्सना कंपनीत भरती केले होते, ज्यामध्ये डायलर, व्हेरिफायर आणि क्लोजर अशा कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सीबीआयने टाकलेल्या छाप्यात एकूण ४४ लॅपटॉप, ७१ मोबाईल फोन, १.२० कोटी रुपये रोख, ५०० ग्रॅम सोने आणि १ कोटी रुपये किमतीच्या सात लक्झरी कार जप्त करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर ५ हजार USDT क्रिप्टोकरन्सी (५ लाख रुपये) आणि २००० कॅनेडियन डॉलर गिफ्ट व्हाउचर (१.२६ लाख रुपये) चे अवैध व्यवहार आढळून आले आहेत. या प्रकाराने संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!