नाशिक – विशेष प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची पदोन्नती झाली असून त्यांची जालन्याच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी काढण्यात आले. मित्तल यांच्या जागेवर कोण, हा प्रश्न मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
‘सुपर फिफ्टी’ उपक्रम
मित्तल यांच्या संकल्पनेतून ‘सुपर फिफ्टी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, ज्याचा उद्देश आदिवासी मुलींना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे, टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने आदिवासी मुलींसाठी कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेने १०० दिवसांच्या कार्यक्रमात चांगली कामगिरी केली, ज्यामध्ये कार्यालयाच्या कामकाजात सुधारणा करण्यात आली. त्यांनी जिल्हा परिषदेच्या निधीच्या गैरव्यवहारांवर कारवाई करत, चुकीचे नियोजन रोखले आहे.
आशिमा मित्तल यांनी नाशिक जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कामाचा एक भाग म्हणून, त्यांनी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीमध्ये सक्रियपणे सहभाग घेतला आहे आणि आवश्यक बदल केले आहेत. तसेच, त्यांनी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजनांवर काम केले आहे.
बदली झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे –
– अजीज शेख, भाप्रसे, व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई. येथून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे. या पदावर.
– अशीमा मित्तल, भाप्रसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.येथून जिल्हाधिकारी जालना या पदावर.
– श्रीकृष्णनाथ पांचाळ, भाप्रसे, जिल्हाधिकारी,जालना येथून जिल्हाधिकारी, ठाणे. या पदावर.
– विकास खारगे, भाप्रसे, मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,मंत्रालय, येथून अप्पर मुख्य सचिव महसूल मंत्रालय,मुंबई या पदावर
– अनिल डिग्गीकर, भाप्रसे, अप्पर मुख्य सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय येथून अपर मुख्य सचिव, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय,मुंबई या पदावर.

























