नाशिक – विशेष प्रतिनिधी
दक्षिण कोरिया येथे दि. २६ ते २८ जुलै होणाऱ्या २० व्या एशियन रोलर डर्बी खेळामध्ये एशियन स्केटिंग गेम्स साठी नाशिकच्या पूजा नवलनाथ तांबे हिची निवड झाली असून स्पर्धेकरिता ती दक्षिण कोरिया येथे रवाना झाली आहे. ही निवड राजस्थान, बीकानेर येथे पार पडलेल्या निवड चाचणीतून झाली.
पूजा तांबे हिने २०२४ साली इटलीमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून देशाचं नाव उज्वल केलं होतं. आता ती आशियाई पातळीवर पुन्हा एकदा आपली छाप सोडण्यासाठी सज्ज आहे. पूजाच्या या यशामध्ये नाशिक जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे ज्ञानेश्वर बुलंगे आणि श्रीमती सविता बुलंगे, तसेच प्रशिक्षक विनय नाकवाल यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य स्केटिंग असोसिएशनचे प्रदीपकुमार सिंग आणि श्रीमती अदेश सिंग यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले. पूजाच्या या निवडीमुळे नाशिकमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि तिने भारताचे नाव पुन्हा एकदा जागतिक पातळीवर उंचावावे, अशी सर्वत्र अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

























