Homeक्रीडानाशिकच्या तनिशा कोटेचाला मिश्र दुहेरीत कांस्य पदक

नाशिकच्या तनिशा कोटेचाला मिश्र दुहेरीत कांस्य पदक

नाशिक – विशेष प्रतिनिधी
उझबेकीस्तान येथे दि. २६ ते २ जुलै २०२५ दरम्यान झालेल्या २९ व्या एशियन यूथ टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२५ मधे नाशिकच्या तनिशा कोटेचा हीने मिश्र दुहेरीत भारताच्या अंकुर भट्टाचार्यजी याच्या साथीने मिश्र दुहेरीत कांस्य पदक पटकावले. या स्पर्धेत चायना, जपान, कोरिया रिपब्लिक, चाईनीज ताईपाई, सिंगापूर, भारत अशा प्रमुख देशाचे संघ सहभागी झाले होते. तनिशा कोटेचा हीने आतापर्यंत ज्युनियर गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेसह सर्व जागतिक जूनियर स्पर्धेत भारताचे आजवर प्रतिनिधित्व करत प्रत्येक स्पर्धेत पदक पटकावले आहे. त्यामध्ये जागतिक ज्युनियर टेबल टेनिस स्पर्धा, एशियन जूनियर चॅम्पियनशिप, साउथ एशियन चॅम्पियनशिप, ब्रिक्स गेम्स व राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धांचा समावेश आहे.

तनिशा कोटेचा व अंकुर भट्टाचार्याजी या जोडीने उप उपांत्य पूर्व फेरीत या स्पर्धेत सहावे मानांकन असलेल्या सिंगापूरच्या क्वेक आयझॅक व सेर लिन या जोडीचा अत्यंत चुरशीच्या सामन्यात ३-२ ने पराभव करून उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला. या फेरीत तनिशा आणि अंकुर यांनी जपान च्या जगतिक अव्वल मानांकन असलेली योशियामा काझुकी व रीन मेंदे या जोडीचा ३-० असा पराभव करून सर्वांना आश्चर्याचा धक्का देत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत कोरियाच्या या स्पर्धेत तिसरे मानांकन असलेल्या किम गॉन व पार्क घाइओन यांच्या बरोबर झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात कोटेचा आणि भट्टाचार्यजी या जोडीला ३-२ ने पराभवाला सामोरे जावे लागले त्यामुळे ही भारतीय जोडी कांस्य पदकाची मानकरी ठरली.
तिच्या या यशाबद्दल नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, महाराष्ट्र टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण लुंकड, सरचिटणीस यतिन टिपणीस, शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड, कोच जय मोडक, संजय कडू आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!