पंचवटी – विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन तर्फे छत्रपती संभाजी नगर येथे राज्यस्तरीय १७ वी मिनी व सहावी चाईल्ड तलवारबाजी स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. १२ वर्षाखालील मुलींच्या गटात कु. शरण्या डेरले हिने सुवर्णपदक पटकावून नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
स्पर्धेत १० वर्षाखालील मुलींच्या गटात अन्विता ताजणे हिने रौप्य पदक पटकावले. या वर्षीची राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा नाशिक येथे होणार असून सेव्हर व फॉईल गटात शरण्या डेरले, अन्विता ताजणे, शौर्य यादव, अनन्या सुळे, चिरायू पाटील, आराध्या कुंभार व मोक्षिता केसकर या पदक विजेत्या स्पर्धकांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना जय शर्मा, राहुल फडोळ व प्रसाद परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे व नाशिक फेन्सिंग असोसिएशनचे सचिव राजू शिंदे यांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

























