Homeमहाराष्ट्रशिक्षण विभाग अंतर्गत १६ अधिकाऱयांच्या एकाच दिवशी बदल्या

शिक्षण विभाग अंतर्गत १६ अधिकाऱयांच्या एकाच दिवशी बदल्या

नाशिक – विशेष प्रतिनिधी
शिक्षण विभाग अंतर्गत १६ अधिकाऱयांच्या एकाच दिवशी बदल्या झाल्या आहेत. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.नितीन बच्छाव यांची थेट गडचिरोली तर माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांची चंद्रपूरला बदली झाली आहे.
हिंगोलीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत प्रकाशराव दिग्रजकर यांची नाशिकला माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. मात्र, प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर नियुक्ती झालेली नाही. शिक्षणाधिकारी बच्छाव यांची थेट गडचिरोलीला बदली झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव मो. बा. ताशिलदार यांनी गुरुवारी (दि.१९) राज्यातील शिक्षणाधिकार्यांच्या बदलीचा आदेश जारी केला. नाशिकचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांची चंद्रपूरला योजना विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून बदली करण्यात आली. यापूर्वी त्यांची बदली झाली होती. परंतु, तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली झाली म्हणून त्यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेत आपली बदली रद्द केला होती. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आता ही बदली करण्यात आली. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.नितीन बच्छाव यांची गडचिरोलीला योजना शिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली आहे. मुळचे मालेगाव जिल्ह्याचे रहिवासी असलेले डॉ.बच्छाव यांची थेट गडचिरोलीला बदली झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर अद्याप नवीन शिक्षणाधिकारी नियुक्त झालेले नाहीत.शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी, अधीक्षकांची बदली यापूर्वीच झाली आहे.
—————————————————-

डॉ. वैशाली झनकर मात्र मुंबईतच…
नाशिकमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत सापडलेल्या डॉ. वैशाली पंकज वीर-झनकर या मुंबईत योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. नवीन आदेशानुसार त्यांची बदली आता मुंबई दक्षिण विभागात शिक्षण निरीक्षकपदी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!