Homeशहर व जिल्हारुग्णावरील उपचारासाठी लाच; वैद्यकीय अधीक्षकासह तीन महिलांविरुद्ध गुन्हा

रुग्णावरील उपचारासाठी लाच; वैद्यकीय अधीक्षकासह तीन महिलांविरुद्ध गुन्हा

नाशिक – विशेष प्रतिनिधी
शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया झालेली असून शस्त्रक्रिया व पेशंट यांना डिस्चार्ज देण्यासाठी ३० हजारांची मागणी करून ११ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी नामको कॅन्सर हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विशाखा जहागिरदार यांच्यासह तीन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लाचखोरी व त्यात तीन महिलांचा सहभाग उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक श्रीमती स्वाती पवार, हवालदार शरद हेंबाडे, युवराज खांडवी, परशराम जाधव, राजश्री अहिरराव यांनी ही कामगिरी केली आहे.

‘एसीबी’ च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. जहागिरदार, महिला कॅशियर तसेच गायत्री सोमवंशी अशी तिघा लाचखोरांची नावे आहेत.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, तक्रारदार हे पिवळे रेशन कार्डधारक असून त्यांची पत्नी यांचे नामको कॅन्सर हॉस्पिटल पेठ रोड नाशिक येथे शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया झालेली आहे. शस्त्रक्रिया व पेशंट यांना डिस्चार्ज देण्यासाठी तक्रार आरोपींनी तीन एप्रिल रोजी ३० हजारांची मागणी केली होती. त्यापैकी नऊ हजार रूपये घेण्यात आले होते.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पडताळणी करण्यात आली. त्यानंतर
उर्वरीत २१ हजारांपैकी ११ हजार रूपये सात एप्रिल रोजी स्वीकारल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!