Homeशहर व जिल्हामनपाच्यावतीने फटाका गाळे लिलावाला चांगला प्रतिसाद; पंचवटीत ५२ गाळ्यांचा लिलाव

मनपाच्यावतीने फटाका गाळे लिलावाला चांगला प्रतिसाद; पंचवटीत ५२ गाळ्यांचा लिलाव

– १२ तहकूब गाळयांची लिलाव प्रकिया होणार

पंचवटी – प्रतिनिधी
मनपाच्यावतीने आयोजित फटका विक्री गाळे लिलावाला पंचवटीत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पंचवटी विभागीय कार्यालयात फटका विक्री गाळे लिलावात एकुण ६४ पैकी ५२ गाळयांचा लिलाव प्रकिया पूर्ण झाली आहे. तर उर्वरित १२ गाळयांचा लिलाव तहकूब झाला असून या सर्व गाळयांचा लिलाव मंगळवारी (दि.७) दुपारी दोन वाजता होणार असल्याची माहिती पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांनी दिली.

नाशिक मनपाच्यावतीने आयुक्त मनिषा खत्री यांच्या आदेशानुसार व उपआयुक्त सुवर्णा दखणे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या पंचवटी विभागीय कार्यालय सभागृहात दुपारी झालेल्या फटका विक्री गाळे लिलावात भाग घेण्यासाठी फटका विक्री व्यवसायिकांनी गर्दी केली होती. सुरक्षारक्षकांनी फक्त लिलावात भाग घेणाऱ्यांकडे टोकन असलेल्यांना प्रवेश दिला होता. त्यामुळे संपूर्ण लिलाव प्रकिया सुरळीतरित्या पार पडली. यावेळी मनपा सहाय्यक आयुक्त तथा पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांनी उपस्थितीत फटका विक्री गाळे लिलावात उपस्थित सर्व फटका विक्री गाळे धारकांना आवश्यक शासकीय नियमावलीचे मार्गदर्शन केले. तसेच मनपाच्या वतीने फटका विक्री गाळे धारकांना आवश्यक सहकार्य केले जाईल असेही विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांनी सांगितले. तसेच पंचवटी विभाग प्रशासकीय अधिक्षक मंगेश वाघ, मिळकत, जाहिरात व परवाने विभागाचे सहायक अधिक्षक भूषण देशमुख यांनी लिलावाचे नियम, अटीशर्थीचे वाचन व बोली प्रक्रिया राबवून उपस्थित सर्व फटका विक्री गाळे धारकांना मार्गदर्शन केले. 

फटका विक्री गाळे लिलावाची संपूर्ण प्रकिया सुरळीतरित्या पार होण्यासाठी लिलाव प्रकिया अधिकारी राजाराम पवार, श्रीमती सीमा गायकवाड, प्रकाश उखाडे, सचिन गवळी, देवेंद्र चव्हाण, संदीप पागे, अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप बोरसे,संजय कानडे, विद्युत विभागाच्या रूपाली गायकवाड, पोपट येवले यांच्यासह स्वच्छता व सुरक्षारक्षक विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

यावेळी मनपाच्यावतीने पंचवटी प्रभागात विविध ठिकाणी फटका विक्री गाळे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.त्याप्रमाणे विविध भागात फटका विक्री गाळे व कंसात संख्या पुढीलप्रमाणे… पेठरोडवरील आरटीओ कार्यालयासमोर (२), म्हसरूळ-दिंडोरीरोड भागातील आरटीओ कॉर्नर-लक्ष्मी बेकरी समोर-१० पैकी १० गाळे लिलाव पूर्ण,गीतानगर (५), मखमलाबाद गाव देवी मंदिरासमोर मोकळी जागा (५), मखमलाबाद रोडवरील पाटा जवळील मोकळी जागा क्रिकेट टर्फ लगत (२ पैकी), बज कॅफे जवळ (२), गामणे मळा (४), रूंग्ठा श्री तिरूमला, मानकर संपर्क कार्यालय जवळ (४), आडगांव मारूती मंदिर व एस.टी.बस स्टॅडजवळ (४), अमृतधाम सॅनिटरी, अग्निशमन दल केंद्र कंपाऊंडजवळ (५), अमृतधाम चौफुली मोकळी जागा (५), बळी मंदिर, प्रमोद महाजन गार्डन जवळ (२), रामलीला मंगल कार्यालय, पोलीस चौकी जवळ (३), तारवाला नगर रोडवरील, धर्मवीर संभाजी चौकजवळ (२), हिरावाडी, कमलनगर चौक (१) तपोवन-साधुग्राम मैदान, बसडेपो समोर (१२).

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!