नाशिक – विशेष प्रतिनिधी
नाशिक जिल्हा टेनिस संघटना म्हणजेच एन.डी.टी.ए. ची त्रिवर्षीय निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. अध्यक्ष म्हणून अद्वैत आगाशे तर उपाध्यक्ष म्हणून समीर कपूर त्याच प्रमाणे डॉ. संजय पिंचा यांची सचिव म्हणुन २०२५ ते २०२८ या तिन वर्षासाठी निवड झाली आहे.
माळवते अध्यक्ष राजीव देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या नशिक जिल्हा टेनिस संघटनेच्या ३७व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये नूतन कार्यकारणीची घोषणा निवडणूक अधिकारी डॉ. हेमंत कोतवाल व निवृत्त आयकर अधिकारी अशोक मुराई यांनी जाहीर केली. अद्वैत आगाशे (अध्यक्ष), समीर कपूर( उपाध्यक्ष), डॉ संजय पिंचा (सचिव) एकनाथ किणीकर(सह सचिव), डॉ विवेक कोठावदे (खजिनदार) तर दिलीप लोंढे, अँड जयदिप वैशंपायन, अमित आहेर, राजन चांदवडकर, सुशांत पटेल, आदित्य राव यांची कार्यकारणी सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
कोविड काळात झालेली संघटनेची विस्कळीत झालेली स्थिती आता चांगल्या स्थितीत आलेली आहे. येथून पुढे नविन तरुण सदस्यांना जास्त वाव देऊन संघटनेचे कार्य उत्कृष्ठपणे करतील असा विश्वास माजी अध्यक्ष राजीव देशपांडे यांनी व्यक्त करत राज्य संघटना व जिल्हा संघटनेच्या सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल तसेच निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
नाशिक जिल्हा टेनिस संघटनेची खेळाडूंना पदाधिकारी म्हणून निवड करण्याची परंपरा चालत आलेली आहे व त्यामूळे मला ही जबाबदारी मिळाली आहे, असे नूतन अध्यक्ष अद्वैत आगाशे यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हा संघटनेचे माजी अध्यक्ष दिपक पटेल, माजी उपाध्यक्ष गोविंद बेळे, नवरचना ट्रस्टचे सचिव डॉ अर्चिज नेर्लेकर, नाशिक जिमखाना कोषाध्यक्ष नितिन चौधरी, विभागीय टेनिस ममन्वयक राकेश पाटील, जिल्हा संघटनेचे अजिव सदस्य सुरेश धात्रक, डी.जे.हंसवाणी, धवल पटेल, पूनम पटेल, डॉ.रमेश मंत्री, रणजीत कोपिकर, सुनिल भाटिया, सुरेंद्र जोशी आदी उपस्थित होते.

























