Homeक्राईमपश्चिम बंगालमधील बॉम्बस्फोटातील फरारी संशयित नाशिकमध्ये जेरबंद

पश्चिम बंगालमधील बॉम्बस्फोटातील फरारी संशयित नाशिकमध्ये जेरबंद

नाशिक – विशेष प्रतिनिधी
पश्चिम बंगाल येथे बॉम्बस्फोट करून नाशिकमध्ये नाव व वेष बदलून वास्तव्य करणाऱ्या संशयितास शहर पोलिसांच्या युनिट एकच्या पथकाने सातपूर येथून ताब्यात घेतले. ‘एनआयए’ अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोलकात्ता युनिटने या संशयिताबाबत माहिती दिल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, पश्चिम बंगाल येथे बॉम्बस्फोट करून फरार आरोपी हा नाशिक शहरात वेष व नाव बदलून वास्तव्य करीत असल्याची राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांना माहीती मिळाली होती. त्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) चे कलकत्ता युनिटचे अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक हे नाशिक शहरात पाहीजे असलेल्या आरोपीताचा शोध घेण्यासाठी आले होते. या पथकाने पोलीस आयुक्त कर्णिक यांची भेट घेऊन संशयिताचा माग काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी युनिट एकच्या पथकास संशयितास जेरबंद करण्याचे आदेश दिले.

युनिट एकच्या पथकाने सातपूर औद्योगिक वसाहतीत व परिसरात सतत दोन दिवस अहोरात्र मेहनत घेवून संशयिताचा ठावठिकाणा व तो राहत असलेल्या ठिकाणाची माहीती मिळवली. त्या माहीतीच्या आधारे संशयितास पकडण्यात यश आले. त्यास कोलकात्ता येथील एनआयए पथकाच्या हवाली करण्यात आले आहे. युनिट एकचे वपोनि कड, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार महेश साळुंके, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, राम बर्डे, विलास चारोस्कर, नितीन जगताप, नाझीमखान पठाण , समाधान पवार यांनी ही कामगिरी बजावली. ‘एनआयए’ च्या पथकाने युनिट एकच्या पथकाला प्रशस्तीपत्रक देत कौतूक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!