Homeक्राईमचोरीसह घरफोडीच्या घटनांमध्ये सव्वा आठ लाखांचा ऐवज चोरीला

चोरीसह घरफोडीच्या घटनांमध्ये सव्वा आठ लाखांचा ऐवज चोरीला

नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरात चोरी व घरफोड्यांच्या वाढत्या घटनांमुळे नाशिककर त्रस्त झाले आहेत. शहराच्या विविध भागात घडलेल्या घटनांमध्ये चोरट्यांनी आठ लाख २५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. विशेष म्हणजे एका घटनेत रिक्षात बसलेल्या दोन महिलांनी एक सहप्रवासी महिलेला गंडवले आहे.

वृद्ध महिलेला गंडवले

पंडीत कॉलनीतून रविवार कारंजा येथे जाण्यासाठी एक वृद्ध महिला नातवासह रिक्षात बसली. रिक्षा अशोक स्तंभावरील गुरांच्या दवाखान्याजवळ आली असता दोन अनोळखी महिला बसल्या. त्यांनी आजी तिकडे सरका…तुमच्या नातूला तिकडे बसवा, असे करत त्यानी वृद्धेकडील पिशवी मधील ठेवलेले छोटे पॉकेट हातचलाखीने काढून घेतले. त्यात सोन्याची पोत, अंगठ्या, मंगळसूत्र, बाळी व ओम पान असा एक लाख ०४ हजारांचा ऐवज होता. या वृद्धेचा मुलगा प्रशांत भावराव निकम (रा. पंडीत कॉलनी) यांच्या तक्रारीन्वये सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून हवालदार घेगडमल तपास करत आहेत.

घरफोडीत पळवला ऐवज

गंगापूर रोडवरील ध्रुवनगर परिसरात तानाजी श्रावण कुवर या ६० वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाच्या फ्लॅटच्या दरवाज्याच्या सेफ्टी डोअरचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून एक लाख ४० हजार ५०० रुपयांची रोकड, सोन्याच्या बांगड्या, झुमके, अंगठी, कानातील रिंग, चांदीचे पैंजण व वाळे असा चार लाख ५१ हजारांचा ऐवज चोरून नेला. गंगापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून सहायक निरीक्षक महाजन तपास करत आहेत.
पुतुलदेवी जिमंदार सिंग (वय ४७ वर्षे, रा.नानेगाव) यांच्या घरातील स्वयंपाकघरामागील खिडकीचे दोन गज कापून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. घरात असलेल्या कपाटातील एक लाखाची रोकड, सोन्याचे दोन नाणे, अंगठी, पायातील चांदीच्या पट्टया असा एक लाख ६० हजारांचा ऐवज चोरून नेला. देवळाली कॅम्प पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून हवालदार जगदाळे तपास करत आहेत.
सौ. मंदा राहुल ठोके (वय ३५ वर्षे, रा.घरकुल योजना, अंबड) यांच्या घरातून चोरट्यांनी सोन्याचे मंगळसूत्र, झुमके, पायातील चांदीच्या पट्टयाचे दोन जोड तसेच मुलांच्या गल्ल्यातील रक्कम असा ६१ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. अंबड पोलीस ठाण्याचे हवालदार चव्हाण तपास करत आहेत.
अनिल धर्मराज खैरनार (वय ५५, रा. डी.एस पार्क महेंद्रा मटेरीअल गेट समोर, सातमाउली चौक, सातपुर) यांच्या घराच्या दरवाज्याचे कडी व कुलूप तोडून चोरट्यांनी ४० हजारांची रोकड व सोन्याचे ओम पान असा ४९ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्याचे श्रेणी उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!