Homeक्राईमठक्कर बझार परिसरात एकाचा खून; तिघे अल्पवयीन अर्ध्या तासात ताब्यात

ठक्कर बझार परिसरात एकाचा खून; तिघे अल्पवयीन अर्ध्या तासात ताब्यात

– युनिट एकची तत्परता …

नाशिक – विशेष प्रतिनिधी
सोबत असलेल्या मैत्रिणीची छेड काढल्याच्या रागातून तिघा अल्पवयीन मुलांनी सिमेंटचा पेव्हर ब्लॉक डोक्यात घालून एकाला जीवे ठार मारल्याची घटना मंगळवारी दुपारी ठक्कर बझार बस स्थानक परिसरात घडली. अत्यंत वर्दळीच्या बस स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून घटनेनंतर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने तत्काळ कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे.

विशेष म्हणजे या घटनेतील मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून तो फिरस्ता किंवा नशेबाज असल्याचा संशय आहे. तर तिघे अल्पवयीन मुले काही कालावधी पूर्वीच मनमाड येथील बाल सुधार गृहातून बाहेर पडले होते. तिघांपैकी एकजण अत्यंत शीघ्रकोपी असून यापूर्वी त्याने जिल्हा रुग्णालयासमोर एका भिकाऱ्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून त्यास गंभीर जखमी केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी १.४५ वाजता ही घटना ठक्कर बझार बस स्थानकाच्या प्रवेश रस्त्याच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर घडली. बरोबर असलेल्या मैत्रिणीची छेड काढल्याच्या रागातून तिघा अल्पवयीन मुलांनी फुटपाथवरील एकावर हल्ला चढवला. जवळच पडलेला पेव्हर ब्लॉक उचलून त्याच्या डोक्यात घातला. हा वार वर्मी बसल्याने त्या पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे अल्पवयीन पळू लागले.

या घटनेची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकातील उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांना कळाली. त्यांनी याबाबत तात्काळ वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना कळवले असता त्यांनी जलद कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, हवालदार प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, संदीप भांड, विशाल देवरे, विशाल काठे, नाझीमखान पठाण, योगीराज गायकवाड, मिलींदसिंग परदेशी, उत्तम पवार, रमेश कोळी, महेश साळुंके, धनंजय शिंदे, रविंद्र आढाव, रोहिदास लिलके, देविदास ठाकरे, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, राहुल पालखेडे, नितीन जगताप, मुक्तार शेख, राम बर्डे, शर्मिला कोकणी, सुकाम पवार तसेच श्रेणी उपनिरीक्षक किरण शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे प्रत्यक्षदर्शींनी हल्लेखोर मेळा बस स्थानकाकडे पळाले असल्याची माहिती दिल्यानंतर पथकाने परिसरात शोध घेऊन तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!