पंचवटी – विशेष प्रतिनिधी
गुन्हेगारी पार्श्वभूमी व हालचाली पहाता म्हसरूळ पोलिसांनी मखमलाबादमधील चौघा युवकांना एक वर्षासाठी नाशिक शहर व जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. ही चौकडी सर्वसामान्य जनतेस धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोला सोमनाथ रायकर (वय २१, रा. शांतीनगर, एकदंत मंदीराजवळ, मखमलाबाद), गणेश रतन सोनवणे (वय २३, रा. फ्लॅट न ४, दोंदे शिल्प अपार्टमेंट, श्रीराम कॉलनी, शांतीनगर), अभिजीत अनिल वाघ (वय २२, रा. खंडेराव मंदीर स्टॉप, मानकर मळा, मखमलाबाद), अनिकेत भारत तिडके (वय २२, रा. फ्लॅट न १४, समर्थ अपार्टमेंट, गामणे मळा, मखमलाबाद) अशी चौघा तडीपारांची नावे आहेत.
चौघांची गुन्हेगारी पार्श्वभुमी व हालचाली पहाता सर्वसामान्य जनतेस धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्याने उपनिरीक्षक दीपक पटारे यांनी हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त (परिमंडळ एक) यांना पाठवला होता. त्यानुसार चौघांना एक वर्षाच्या कालावधीसाठी शहर व जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्यांची जिल्ह्याबाहेर रवानगी करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त पद्मजा बढे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अंकुश चिंतामण, उपनिरीक्षक दिपक पटारे, हवालदार देवराम चव्हाण, राकेश शिंदे, बाळासाहेब मुर्तडक, प्रशांत वालझाडे, प्रशांत देवरे, जितेंद्र शिंदे, पंकज चव्हाण, पंकज महाले, ज्ञानेश्वर कातकाडे, गुणवंत गायकवाड, स्वप्नील गांगुर्डे, भाउराव गवळी, नितिन पारधे यांनी ही कारवाई केलेली आहे.

























