नाशिक – विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या अध्यक्ष व विविध पदांसाठी पुणे येथील सह्याद्री क्रीडा संकुलात झालेल्या निवडणुकीत आ. रोहित पवार व इतर पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली आहे. यात नाशिकमधील संजय आप्पा चव्हाण, गोरखनाथ बलकवडे व हिरामण वाघ यांचा समावेश आहे.

पुणे येथे रविवारी झालेल्या बैठकीत बिनविरोध निवडीची घोषणा झाली आहे. यात अध्यक्षपदी आमदार रोहीतदादा पवार, कार्याध्यक्षपदी धवलसिंग मोहीते पाटील तर संजय आप्पा चव्हाण, काका पवार, संभाजी वरूटे, गणेश कोहळे, ॲड.तुषार पवार, अमोल बुचडे (उपाध्यक्ष), सरचिटणीसपदी विजय बराटे,
खजिनदार सुरेश पाटील, तांत्रिक सचिव बंकट यादव, विभागीय सचिव गोरखनाथ बलकवडे, संपत साळूंके, अनिल पांडे, वामन गोते यांची तर
प्रांतिक प्रतिनिधी म्हणून हिरामण नाना वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे.

























