अहिल्यानगर –
जिल्ह्यातील नेवासा फाटा येथील कालिका फर्निचर दुकानाला लागलेल्या भीषण आगीमध्ये रासने कुटुंबातील पाच जणांचा हृदयद्रावक मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मालक मयूर रासने यांच्यासह पत्नी, दोन लहान मुले व वृद्ध महिलेचा समावेश आहे. या भीषण दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत कुटुंब फर्निचर दुकानाच्या वरच्या मजल्यावर वास्तव्यास होते. आगीच्या कचाट्यात सापडल्याने संपूर्ण कुटुंबच संपलं. रविवारी रात्री दुकानाला लागलेले भडकल्याने या कुटुंबाला बाहेर पडताच आले नाही. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा संशय आहे. या दुर्घटनेत मयूर रासने (४५), पत्नी पायल (३८), मुलगा अंश (१०) व चैतन्य (७) तसेच ७० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तर यश किरण रासने हा जखमी झाला आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळेत पोहचूनही आगीच्या तीव्रतेमुळे ते या कुटुंबियांना वाचवू शकले नाही.

























