Homeशहर व जिल्हा'सिटीलिंक' ला मिळाला पूर्णवेळ 'सीईओ'; मात्र प्रवाशांचे हाल थांबणार का ?

‘सिटीलिंक’ ला मिळाला पूर्णवेळ ‘सीईओ’; मात्र प्रवाशांचे हाल थांबणार का ?

– बस सेवेला शिस्त लावण्याची गरज…

नाशिक । विशेष प्रतिनिधी
अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थात ‘सिटीलिंक’ ला अखेर पूर्णवेळ ‘सीईओ’ मिळाला आहे. यापूर्वी नाशिक महापालिकेत आयुक्त म्हणून काम करताना गोदावरी संवर्धनासाठी उल्लेखनीय काम करणारे विजयकुमार मुंडे ‘सिटीलिंक’ चे सीईओ असतील. ठेकेदाराच्या मर्जीवर अवलंबून असणाऱ्या ‘सिटीलिंक’ ला शिस्तीचे धडे नाशिककर प्रवाशांना चांगली सेवा कशी मिळेल यासाठी मुंडे यांना कार्यरत रहावे लागणार आहे.
राज्य परिवहन मंडळाची पूर्वीची बससेवा बरी होती, अशी परिस्थिती ‘सिटीलिंक’ सेवेने नाशिककरांवर आणून ठेवली आहे. अनेक समस्यांचे ‘स्पीड ब्रेकर्स’ पार करत शहरात या बसेस बेशिस्तपणे वावरत आहेत. मुजोर चालक, मनमानी करणारे वाहक, रिक्षा चालकांनाही लाजवेल अशा बेशिस्तपणे चालवल्या जाणाऱ्या बसेस, थांब्यावरील प्रवाशांना ताटकळत उभे ठेवत आपल्याच धुंदीत बस चालवणे असे बरेच कटू अनुभव प्रवासी घेत आहे. या परिस्थितीत तातडीने सुधारणा होणे गरजेचे आहे. चालक व वाहक सिटीलिंकचा चेहरा आहेत. हा चेहरा भेसूर होणार नाही यासाठी त्यांना शिस्तीचे व सामाजिक जबाबदारीचे भान करू द्यावे लागणार आहेत. बसेसच्या वाढत्या अपघातांनाही ‘ब्रेक’ लावावा लागेल.
या वाहतूक सेवेसाठी २०० सीएनजी व ५० डिझेलच्या बसेस शहरात धावत असतात. मात्र अनेक मार्ग असे आहेत की ज्यांची गरज नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात गरजेच्या मार्गांसाठी या सेवेचे नियोजन व्हायला हवे. ज्या ठिकाणी बस जात नाही त्या ठिकाणी सुद्धा बस थांबे टाकण्यात आले आहे. नाशिकसह लगतच्या २० किलोमीटर क्षेत्रातील ग्रामीण भागातही सिटीलिंकामार्फत सेवा पुरविली जात आहे. मात्र, ही बससेवा तोट्यात आहे. हा तोटा दूर करण्यासाठी सीईओ मुंडे यांना शिवधनुष्य उचलावे लागणार आहे. कंत्राटदाराकडून चालवली जाणारी ही बससेवा पगारासारखी हक्काची पुर्तता न झाल्यामुळे अनेकवेळा संपाच्या सावटाखाली असते. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी संबंधित कंत्राटदारावर महामंडळाचे योग्य ते नियंत्रण असणे गरजेचे आहे.

—————————————————-

… आव्हानेच अधिक !

नाशिक महानगरपालिकेचे तिजोरीतून दरवर्षी या बस सेवे साठी जवळपास 75 कोटी रुपये दर वर्षाला खर्च नाशिक महानगरपालिका करावा लागतो. त्यामुळे या पैशांचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. बस सेवेला शिस्त लावणे, तोटा कमी करून सेवा नफ्यात आणणे हे मुख्य आव्हान नवीन सीईओंसमोर असणार आहे.
तिकीट चेकर वाहक व अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार मागील काही काळात समोर आला होता. त्यामध्ये सिटीलिंकचे असलेले मॅनेजर व तिकीट चेकर नोकरीला लागण्याकरता दिलेले पैसे, मूळ पगारापेक्षा कॉन्ट्रॅक्टर पगार कमी देतो या झालेल्या तक्रारी तसेच वाढता भ्रष्टाचार अशा अनेक अंतर्गत विषयांना सुद्धा नव्या सीईओंना सामोरे जावे लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!