नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहर पोलीस दलातील पाच पोलीस निरीक्षक यांना ‘एसीपी’ अर्थात सहायक आयुक्त म्हणून पदोन्नती मिळाली आहे. या अधिकाऱ्यांनी राज्यात विविध ठिकाणी उत्कृष्ट सेवा बजावली आहे. गुन्हेगारी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था उत्कृष्टपणे हाताळणे, नागरीकांशी चांगल्या प्रकारे संवाद, प्रशासकिय कामकाज तसेच वरिष्ठांनी दिलेले कामकाज चांगल्या प्रकारे हाताळून कार्यकुशलता व प्रामाणिक सेवा या उल्लेखनिय कामगिरीच्या आधारे महाराष्ट्र शासनाने त्यांची सहायक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती दिलेली आहे.
शहर पोलीस दलातील निरीक्षक दिवाणसिंग वसावे (शहर वाहतुक शाखा), दिनकर कदम (शहर वाहतुक शाखा), सुभाष भोये (नियंत्रण कक्ष) इरफान शेख (आर्थिक गुन्हे शाखा), श्रीमती नम्रता देसाई (नियंत्रण कक्ष) यांना पदोन्नती मिळाली असून आता ते सहायक आयुक्त पदावर कामकाज पाहतील.
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी सहायक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती झालेल्या पोलीस निरीक्षक यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. तसेच नविन जबाबदारीसाठी त्यांचे अभिनंदन करण्यात आले. पुढील सेवेतही त्यांनी यशाची शिखरे गाठावित व सदर पदावरून समाजाची व पोलीस दलाची चांगल्या प्रकारे सेवा व्हावी म्हणुन शुभेच्छा दिल्या आहेत.

























