Homeमहाराष्ट्रमराठी भाषाप्रेमींच्या आंदोलनासाठी ठाकरे ब्रँड एकत्र !

मराठी भाषाप्रेमींच्या आंदोलनासाठी ठाकरे ब्रँड एकत्र !

मुंबई –
पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आता ‘ठाकरे ब्रँड’ एकवटला आहे. मराठी भाषाप्रेमींच्या आंदोलनाला धार यावी यासाठी उद्धव व राज या ठाकरे बंधुंनी लवचिकता दाखवत पाच जुलैला एकत्रित मोर्चा काढण्याचे निश्चित केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी समाजमाध्यमांवर याबाबतची माहिती दिली आहे.

याआधी ठरलेल्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहा जुलैस मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान दरम्यान मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. तर, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषाप्रेमींच्या ७ जुलै रोजीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मराठीच्या प्रश्नावर दोन वेगळ्या भूमिका वा आंदोलन दिसू नये अशा चर्चा सुरू झाल्यानंतर वेगाने हालचाली घडल्या व ठाकरे बंधूचे अखेर एकत्र मोर्चा काढण्यावर एकमत झाले. याबाबत आपलं दोन्ही नेत्यांशी बोलणं झाल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात सध्या हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली असून त्यास विरोध होत आहे. त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली आमच्या लहान मुलांवर हिंदी भाषा लादली जात आहे. हे हिंदी भाषेचं ओझं आमच्या मुलांना पेलवणार नाही, असं भाषातज्ज्ञांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रातील अनेक राज्यांची तशीच भूमिका आहे. आमचा काही हिंदी भाषेला विरोध नाही. मात्र, शालेय शिक्षणात अशा प्रकारची जबरदस्ती आम्ही खपवून घेणार नाही. या त्रिभाषा सूत्रातून गुजरात राज्याला मात्र वगळलं आहे आणि महाराष्ट्रावर सक्ती केली जात आहे, असे खा. राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्था-संघटनांनी विरोध करत ७ जुलै रोजी मोर्चाचं आयोजन केलं होतं. त्यास उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी ६ जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं. आम्हाला त्याविषयी कल्पना नव्हती. मात्र, या दोन्ही घोषणा झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मला फोन केला. ते म्हणाले, मला तुमच्या मोर्चाची कल्पना नव्हती. मात्र, अशा पद्धतीने मराठी भाषेसाठी दोन-दोन मोर्चे निघणं बर दिसतं नाही. एकत्र आंदोलन झालं तर त्याचा मोठा प्रभाव दिसू शकतो. मी त्यावर आमच्या पक्षप्रमुखांशी चर्चा केली. उद्धव ठाकरे त्यावर आढेवेढे न घेता म्हणाले, माझीही वेगळ्या मोर्चाची भूमिका नाही. मात्र ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्यामुळे आंदोलन लोकांपर्यंत पोहोचवणं कठीण होईल’. ही गोष्ट मी राज ठाकरे यांना कळवली. व त्यांना ५ जुलै ही तारीख सुचवली. त्यावर राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलून होकार दिला. त्यामुळे ५ जुलै रोजी मोर्चा काढला जाईल. या मोर्चातून सरकारला मराठी माणसाची ताकद दिसेल. कोणत्याही राजकीय अजेंड्याशिवाय हा मोर्चा असेल, असे खा. राऊत यांनी स्पष्ट केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!