मुंबई –
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत कामकाज सुरू असताना मोबाइलवर पत्ते खेळण्याच्या कथित प्रकरणामुळे अखेर ना. माणिकराव कोकाटे यांनी त्यांनीच वर्णन केलेली ‘ओसाड गावची पाटीलकी’ अर्थात कृषी खाते गमावले आहे. ना. कोकाटे आता राज्याचे क्रीडा मंत्री असतील.
कृषीमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर विविध वक्तव्यांमुळे ना. कोकाटे यांच्यावर टीकेचा भडीमार होत होता. त्यातच विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात कामकाज सुरू असताना मोबाईलवर पत्ते खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात विशेषतः शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. एकूणच वादग्रस्त वक्तव्य व कृत्यामुळे ना. कोकाटे मंत्रीपद गमावणार असे चित्र असताना खाते बदलावर निभावले आहे. कोकोटे यांच्या ऐवजी ना. दत्तात्रय भरणे राज्याचे कृषीमंत्री असतील.

























