Homeउत्तर महाराष्ट्र'नाट्यरसिक, नाशिक' चा सहावा एकांकिका महोत्सव ९ जूनला

‘नाट्यरसिक, नाशिक’ चा सहावा एकांकिका महोत्सव ९ जूनला

नाशिक –
येथील नाट्यरसिक, नाशिक तर्फे स्व. मनोज नागपुरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सोमवार दिनांक ९ जून रोजी ६ व्या एकांकिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समूह प्रशासक श्रीराम वाघमारे यांनी दिली.
नुकताच नाट्यरसिक, नाशिक तर्फे ५ वा एकांकिका महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्या अंतर्गत “वळण” (लेखक राजेंद्र चिंतावार, दिग्दर्शक महेंद्र चौधरी), “अंतिम सत्य” (लेखक विकास सोनवणे, दिग्दर्शक विकास सोनवणे, जयदीप पवार) आणि “रंग रंगीला बैल सयाना” (लेखक, दिग्दर्शक हेमंत गवळे) या एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले.
दिनांक ९ जून रोजी परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या एकांकिका महोत्सवात स्वप्ना प्रसाद लिखित, दिग्दर्शित “टिक टिक टिक”, श्रीराम वाघमारे लिखित, धनंजय वाबळे दिग्दर्शित “आनंद” आणि शरद तिळवणकर लिखित, सतिश वराडे दिग्दर्शित “शर्मिली शोध” या एकांकिका तसेच धनंजय वाबळे दिग्दर्शित “जंक्शन” या नाट्यप्रवेशाचे सादरीकरण होणार आहे. प्रकाश योजना जयदीप पवार तर संगीत संयोजन सचिन रहाणे यांचे आहे.

या एकांकिकांमध्ये जय शुक्ल, पूजा चव्हाण, रोहन पाटील, स्वानंदी पवार, प्रतिक जोशी, श्रीराम गोरे, मंजुषा ठाकरे, गीतांजली नाईक, ज्योत्स्ना डगळे, सनी धात्रक, किर्ती नागरे, संकेत पगारे, संगीता सोनार, हर्षाली भोसले, ध्रुव ठोके, आभास विंगळे, तनिष्क देशपांडे, उपासना वानखेडे, निरंतरा पाटील, भार्गवी कलंत्री, अनंत पाटील, हिरण्या खालकर, सान्वी भामरे, आरव ठाकरे, शुद्धेन भामरे, आरोही ठाकरे, देवाशिष जगताप, सारिका कलंत्री, मनिषा ठाकरे, कुणाल विधाते इत्यादी कलाकार भूमिका साकारत आहेत. या महोत्सवासाठी श्रीकांत बेणी यांचे विशेष सहकार्य लाभले असून आयोजन समिती मध्ये संगीता फुके, मंजुषा ठाकरे, गीतांजली नाईक, दिपा पाटील, अविनाश वाघ, जयप्रकाश पुरोहित, कैलास पाटील हे विशेष परिश्रम घेत आहेत. एकांकिका महोत्सव हा नाट्यरसिक आणि रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे. तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!