Homeक्राईमनांदूर नाका हाणामारी प्रकरणी पाच जणांना अटक, माजी नगरसेवक उद्धव बाबा निमसे...

नांदूर नाका हाणामारी प्रकरणी पाच जणांना अटक, माजी नगरसेवक उद्धव बाबा निमसे यांच्यावरही गुन्हा नोंद

पंचवटी – विशेष प्रतिनिधी
शहरासह ग्रामीण भागात बैल पोळ्याचा सण साजरा होत असताना किरकोळ कारणावरून प्राणघातक सशस्त्र हल्ला करून दोघांना गंभीर जखमी केल्याने शुक्रवारी रात्री पोलिसांवरील ताण वाढला होता. नांदूर नाका येथे घडलेल्या यातील एकाचा चॉपरने वार करून कोथळा बाहेर काढला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून माजी नगरसेवक उद्धव बाबा निमसे तसेच इतर फरारी संशयितांचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघराज सुनील जोजारे, गणेश राजाभाऊ निमसे, रोशन लक्ष्मण जगताप, अक्षय अशोक पगार, सुधीर उर्फ गोटीराम माधवराव निमसे अशी अटक केलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. यात अजय दत्तू कुसाळकर, राहूल संजय धोत्रे हे दोघे तरूण जबर जखमी झाले आहेत.

आकाश राजु थोत्रे (वय २९, रा. जर्नाधन नगर, तुळजाभवानी मंदीरा समोर, नांदूर नाका) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास भाऊ सनी राजू धोत्रे याचे निमसेंच्या दोन मुलांसोबत नांदुर नाका येथे किरकोळ वादाच्या कारणावरून सायंकाळी ०६.१५ ते ०७.०० वाजताच्या दरम्यान नांदुर गाव व परिसरात राहणारे उद्धव उर्फ बाबा बाबूराव निमसे यांनी मला शिवीगाळ व दमदाटी करून गर्दी जमवून चिथावणी दिल्याने त्यातील पवन निमसे, संतोष मते, सचिन दिंडे, स्वप्निल बागुल, सुधीर निमसे उर्फ गोट्‌या, अक्षय अशोक पगार, मेघराज जोजारे, गणेश राजाभाउ निमसे, रोशन जगताप व इतर १० ते १५ इसमांनी लाकडी, लोखंडी दांडे व चाकू सारखे हत्यार घेवून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने माझा आत्याचा मुलगा अजय दत्तू कुसाळकर, वय २७ वर्षे व भाऊ राहूल संजय धोत्रे यांचा पाठलाग करत अजय कुसाळकर यास त्याच्या घराच्या मागे, जनार्दन नगर (नांदुर नाका) येथे सुमित हांडोरे याने चॉपरने व इतरांनी देखील लाकडी व लोखंडी दांड्यांनी मारहाण करून त्याच्या डोक्यास, हातास व पायास गंभीर जखमी केले व भाऊ राहूल संजय धोत्रे यास दिंडे मळा, नांदुर नाका, नाशिक येथे सुमित हांडोरे याने चॉपरने मारहाण करून त्याच्या पोटाच्या उजव्या बाजूतून कोथळा बाहेर काढला व इतरांनी त्याच्या डोक्यास मारहाण करून त्यास गंभीर जखमी केले आहे. सहायक निरीक्षक निखील बोंडे तपास करत आहेत.

बंदूक काढली…पोलिसांनाही शिवीगाळ

– आकाश राजु धोत्रे याने दिलेल्या तक्रारीन्वये या हाणामारीत अनेक धक्कादायक बाबी घडल्या आहेत. दोन गटात वाद झाल्याने नांदुर नाका परिसरात तणाव निर्माण झाला होता. आडगाव पोलिसांना याची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सनी धोत्रे व शुभम तिडके यांना पोलीस गाडीत बसवून तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यास घेवून गेले.

– सायंकाळी ०६.१५ वाजताच्या सुमारास जनार्दन नगर येथील तुळजा भवानी मंदिराजवळ उध्दव उर्फ बाबा बाबूराव निमसे यांची गाडी आली. तेव्हा उध्व निमसे हे मला बोलले की, ‘निमसेंना मारलं का तुम्ही, आम्ही इथले बाप आहोत, बाप, तुम्ही बाहेरून येवून आमच्या गावात गुंडागर्दी करशाल का ? त्यानंतर त्यांनी मला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यांच्या पाठोपाठ पवन निमसे, संतोष मते, सचिन दिंडे, स्वप्निल बागुल, सुधीर निमसे उर्फ गोट्या हे देखील तेथे आले. तेव्हा उध्व निमसे यांनी सर्वांना उ‌द्देशून ‘या सर्व धोत्रेना मारून टाका, बाहेरून येवून आम्हाला मारतील का? यांना संपवून टाका, यांना सोडू नका’ असे बोलले.

– तेव्हा आकाश धोत्रे व माझे काका सिकंदर धोत्रे हे उद्धव निमसे यांच्या पाया पडत होते, परंतू ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते व शिवीगाळ करत होते. त्यानंतर पवन निमसे याने त्याच्या हातात एक छोटी बंदूक काढली, त्यामुळे राहूल संजय धोत्रे, माझ्या अजय कुसाळकर हे तेथून घराच्या गल्लीकडे पळाले.

– सुमित हांडोरे याच्या हातात चॉपर सारखे हत्यार घेवून साथीदारांसह आला. ते पण धोत्रे यांच्या घराच्या गल्लीकडे पळाले. काही लोकं हे संभाजी नगर हायवे लगत देखील उभे होते. त्यानंतर पुन्हा तेथे पोलीस गाडी आली व त्यांनी गर्दीची पांगापांग केली. तेव्हा उध्द्ध निमसे यांनी पोलीसांना देखील शिवीगाळ केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!