Homeक्राईम'डिजिटल अरेस्ट' मधील ऑनलाईन फसवणुकीचे सव्वातीन लाख रूपये तक्रारदारास परत

‘डिजिटल अरेस्ट’ मधील ऑनलाईन फसवणुकीचे सव्वातीन लाख रूपये तक्रारदारास परत

नाशिक – विशेष प्रतिनिधी

निफाड तालुक्यातील एकास स्काईप या अॅप्लीकेशनव्दारे स्टटमेंट व व्हेरीफिकेशन साठी पोलीस गणवेशात व्हिडीओ कॉल करत ‘डिजिटल अरेस्ट’ ची धमकी देण्यात आली होती. आरोपींनी तक्रारदार यांच्या बँक खात्याची गोपनीय माहीती प्राप्त करून बँक खात्यावरून १० लाख रूपये पर्सनल लोन मंजुर करून घेतले होते. ते पुढे आरोपीतांनी ‘आरटीजीएस’ व्दारे त्यांचे बँक खात्यात वळवून घेतले. त्यातील तीन लाख २२ हजार रुपये परत मिळवण्यात ग्रामीण पोलिसांच्या सायबर शाखेला यश आले आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, सुरज भाउसाहेब काळे (रा. टाकळी विंचुर, लासलगाव, ता. निफाड) यांना आरोपीनी संपर्क करून फेडेक्स ब्रँच, अंधेरी येथून बोलत असल्याचे सांगितलं. तुमच्या नावे एक पार्सल प्राप्त झाले असून त्यामध्ये बेकायदेशीर सामान पाठविण्यात आले आहे. त्यात ०४ ईराणी पासपोर्ट व ड्रग्स आणले आहे, असे सांगून तक्रारदार यांना स्काईप या अॅप्लीकेशनव्दारे स्टटमेंट व व्हेरीफिकेशन साठी पोलीस गणवेशात व्हिडीओ कॉल केला व डिजिटल अरेस्टची धमकी देत तक्रारदार यांच्या बँक खात्याची गोपनीय माहीती प्राप्त केली. त्यांच्या बँक खात्यावरून १० लाख रूपये पर्सनल लोन मंजुर करून ते पुढे आरोपीतांनी ‘आरटीजीएस’ व्दारे त्यांच्या बँक खात्यात वळवून तक्रारदार यांची फसवणूक केली होती.

याप्रकरणी तक्रार आल्यानंतर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस निरीक्षक नागेश मोहिते व हवालदार सुवर्णा आहिरे यांनी या तक्रारीची तात्काळ दखल घेत बँकेला पत्रव्यवहार केला. संबंधित खाते गोठविण्यात आले व त्यावर शिल्लक असलेले तीन लाख २२ हजार रुपये तक्रारदार यांना न्यायालयाचे आदेशाने परत मिळवुन देण्यात आले.
—————————————————————

नागरिकांना आवाहन –

नाशिक ग्रामीण पोलिसांनी जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपण अनोळखी फोन कॉल्सवर विश्वास ठेवून आपल्या बँक खात्याची वैयक्तीक माहिती अनोळखी व्यक्तीस देऊ नये. कोणतीही बँक अशा प्रकारची माहिती फोनद्वारे विचारत नाही. बँक खात्याविषयी माहिती करीता संबंधीत बँकेच्या शाखेत जाऊन खात्री करावी. तसेच फोनवर पाठविण्यात आलेल्या अनोळखी लिंक विषयी माहिती नसल्यास त्यावर क्लिक करू नये. आपल्या नावे कोणते पार्सल आले आहे. किंवा मनीलाँड्रींग असे आहे. अशा बाबत कोणताही फोन आल्यास विश्वास ठेवू नये. बाबत सायबर पोलीस ठाणे किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. तसेच आपली गोपनीय माहीती (बँक खाते नंबर, ओटीपी) देऊ नये. आपल्या बरोबर अशी कोणत्याही प्रकारची फसवणुक झाल्यास लागलीच जवळील पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. अथवा सायबर हेल्पलाईन कमांक १९३० किंवा १९४५ तसेच सायबर काईम पोर्टल cybercrime.gov.in यावर तकार नोंदवावी.

नाशिक ग्रामीण सायबर पोलीस स्टेशन क्रमांक फोन नं. ०२५३-२२००४०८

E.Mail-cybercrime.nr@mahapolice.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!