Homeराष्ट्रीयलंडनमध्ये स्थायिक होण्याच्या स्वप्नांची झाली राखरांगोळी

लंडनमध्ये स्थायिक होण्याच्या स्वप्नांची झाली राखरांगोळी

उदयपूर –
अहमदाबाद विमानतळावर गुरूवारी दुपारी झालेल्या भीषण विमान अपघातात शेकडो प्रवाशांना क्षणार्धात प्राण गमवावे लागले. यात राजस्थानमधील एका दाम्पत्याचा तीन लहानग्या मुलांचा समावेश आहे. पत्नी व मुलांना लंडनमध्ये स्थाईक करण्याचे सॉफ्टवेअर व्यावसायिकाचे स्वप्न होते. त्यात अनेक अडचणी येत होत्या. अखेरीस पत्नीला व मुलांना ‘क्लिअरन्स’ मिळाला. आता लंडनमध्ये सुखाने संसार करू असे स्वप्न बाळगून हा परिवार विमानात बसला. मात्र काही क्षणात झालेल्या अपघातात या परिवाराच्या स्वप्नांची अक्षरशः राखरांगोळी झाली. पाचही जणांचा या अपघातात मृत्यू झाला.

लंडनमध्ये गेल्या सहा वर्षांपासून स्थायिक असलेल्या प्रतिक जोशी हे सॉफ्टवेअर व्यावसायिक. ते मुळचे बांसवाडा (राजस्थान) मधील. त्यांच्या पत्नी डॉ. कोमी व्यास या उदयपूरमधील पँसिफिक हॉस्पिटलमध्ये सेवारत होत्या. पती परदेशात असल्यामुळे वैद्यकीय सेवा व तीन मुलांना सांभाळण्याची दुहेरी जबाबदारी लीलया पार पाडायच्या. आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन लंडनमध्ये स्थाईक होण्याचे प्रतिक जोशी यांचे स्वप्न होते. मात्र त्यासाठी आवश्यक त्या परवानगी मिळत नसल्याने ते अनेक वर्ष प्रतिक्षेत होते.

अखेरीस अलीकडेच सर्व क्लिअरन्स मिळाले व प्रतिक जोशी हे कुटुंबाला नेण्यासाठी भारतात आले. डॉक्टर पत्नी आपल्या वैद्यकीय सेवेचा राजीनामा दिला. नातेवाईकांचा निरोप घेऊन लंडनमध्ये स्थायिक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे दाम्पत्य मुलगी व दोन मुलांसह अहमदाबाद येथील विमान तळावरून विमानात बसले. विमानातून प्रतिक जोशी यांनी आपल्या कुटुंबाची एकत्रित सेल्फी काढून नातेवाईकांना पाठवली. मात्र विमानाने उड्डाण घेतले व काही क्षणात भीषण अपघात झाला. विमानाला लागलेल्या आगीत या कुटुंबाचे लंडनमध्ये स्थायिक होण्याच्या स्वप्नाची मात्र राखरांगोळी झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!