Homeक्राईममद्यपी मुलाचा खून; आई-वडिलांसह मेव्हण्यास अटक

मद्यपी मुलाचा खून; आई-वडिलांसह मेव्हण्यास अटक

नाशिक – विशेष प्रतिनिधी
दारूच्या आहारी जाऊन घरातच धिंगाणा करणाऱ्या विशाल गोकुळ पाटील याचा तोंडावर उशी दाबून तसेच ओढणीने गळफास देऊन खून केल्याची घटना शिवाजीनगर (सातपूर) परिसरात समोर आली आहे. ही शवविच्छेदनातून उघड झाल्यानंतर गंगापूर पोलिसांनी मयत युवकाचे आई-वडील तसेच मेहूण्यास अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पाटील हा मद्यपी युवक घरात निपचित पडला असल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार गंगापूर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत, सहायक निरीक्षक निखील पवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. विशाल यास जिल्हा रुग्णालयात हलवले असता तो मयत असल्याचे आढळून आले. अंगावर कोणत्याही जखमा नसल्याने मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला. यात मयताच्या मानेचे मणके तुटलेले असल्याचे तसेच गळा आवळल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी घरच्यांवर तपासाची दिशा निश्चित केली.

गंगापूर पोलिसांनी केलेल्या अधिक तपासात मयत विशाल पाटील याला दारूचे अधिक व्यसन होते. दारू पिल्यानंतर आई-वडिलांना व मेव्हण्यास शिवीगाळ व मारहाण करायचा. विशालच्या सततच्या त्रासाला घरचे कंटाळले होते. मयताची पत्नी पूजा विशाल पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी ११ वाजता विशाल पाटील घरी आला. दारू पिण्यासाठी पैसे मागितले. परंतू पैसे न मिळाल्याने तो घरातील भांडी विकण्यासाठी घेऊन जाऊ लागला. यावरून वाद झाला. तेव्हा विशाल हा सवयीप्रमाणे मारहाण व शिवीगाळ करू लागला. तेव्हा विशाल यासही मारहाण करण्यात आली. विशाल हा आवरला जात नसल्याने त्याच्या तोंडावर उशी दाबण्यात आली तसेच ओढणीने गळा आवळण्यात आला. यातच विशालचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडील गोकुळ पाटील, आई शशिकला पाटील व मेव्हणे उमेश काळे यांना अटक करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!