Homeक्राईमफुलेनगर गोळीबार; माजी नगरसेवक जगदीश पाटीलच्या पोलीस कोठडी वाढ

फुलेनगर गोळीबार; माजी नगरसेवक जगदीश पाटीलच्या पोलीस कोठडी वाढ

पंचवटी – विशेष प्रतिनिधी
फुलेनगरमधील राहुल वाडी येथे सागर विठ्ठल जाधव याच्यावर गोळीबार करणाऱ्या प्रतिस्पर्धी टोळीसोबत कटात सहभागी असल्याच्या गंभीर आरोपावरून पंचवटी पोलिसांनी अटक केलेले भाजपाचा माजी नगरसेवक इंजिनिअर जगदीश पाटील याच्या पोलीस कोठडीची मुदतीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे पाटील याचे राजकीय भवितव्य आता अधातंरी असल्याची चर्चा आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, फुलेनगर मधील राहुलवाडी येथे १७ सप्टेंबरला रात्री उशिरा अंत्यसंस्कार आटोपून ओट्यावर बसलेला सागर विठ्ठल जाधव (वय ३५) यास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने विकी उत्तम वाघ व विकास उर्फ विकी विनोद वाघ व इतर साथीदार यांनी पूर्व वैमनस्य व वर्चस्ववादातून पिस्तुलातून गोळी झाडली होती. ही गोळी त्याच्या डाव्या डोळयाच्या खाली लागून तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर अद्याप उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पंचवटी व भद्रकाली पोलिसांचे गुन्हे शोध पथक तसेच गुंडा विरोधी पथकाने संयुक्त कामगिरी करत १२ जणांना अटक केली होती. तर उर्वरीत हल्लेखोरांचा अद्याप शोध सुरू आहे.

तपासादरम्यान पोलिसांना अमरावती कारागृहात शिक्षा बंदी असणारा शेखर निकम याच्यासोबत हल्ल्यापूर्वी जगदीश पाटील व हल्लेखोर यांची बैठक झाल्याचे तांत्रिक पुरावे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पंचवटी पोलिसांनी मागील रविवारी जगदीश पाटील यास अटक केल्याने राजकीय वर्तृळात खळबळ उडाली होती. त्यास २६ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. आता कोठडीची मुदत वाढवण्यात आली असून पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!