Homeक्राईमउपनगर परिसरात दोन चेन स्नॅचिंग; दोन लाख १० हजारांचा ऐवज खेचला

उपनगर परिसरात दोन चेन स्नॅचिंग; दोन लाख १० हजारांचा ऐवज खेचला

नाशिक – विशेष प्रतिनिधी
उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवरून आलेल्या दोघा स्नॅचरने दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पळवले. यात दोन लाख १० हजारांचा ऐवज जबरीने चोरून नेला असून पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत. शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना पुन्हा वाढीस लागल्याने महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. चंद्रभागा नारायण अंभोरे (वय ५५, रा. समता नगर, आगर टाकळी रोड, गांधीनगर) या इंद्रायणीनगर बस स्टॉपवर उभ्या असताना दुचाकीवरून दोघे जण हेल्मेट परिधान करून आले. त्यापैकी मागे बसलेल्याने सौ. अंभोरे यांच्या गळ्यातील एक लाख १० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचले. त्यानंतर दोघांनी पळ काढला.

दुसरी घटना बिटको नजिकच्या गंधर्वनगरी चौकातील रिक्षा थांब्याजवळ घडली. किरण वंसत समेळ (वय ६५, रा. प्लॉट नं ०९, ईरन गार्डन सोसायटी, तुलसी आय हॉस्पिटल जवळ, नाशिक पुणेरोड) हे आत्या श्रीमती रजनी दिनानाथ समेळ (वय ८८) व श्रीमती वंदना देसाई यांच्या समवेत औषध खरेदी करून गंधर्वनगरी चौक येथून पायी जात असताना पाठीमागून एका मोटारसायकल वरून दोघेजण आले. त्यापैकी मागे बसलेल्याने श्रीमती रजनी समेळ यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किंमतीची सोन्याची चेन खेचली. त्यानंतर दोघांनी पळ काढला. उपनगर पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक दाभाडे दोन्ही गुन्ह्यांचा तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!