Homeक्राईमअमृतधाम परिसरात चेन स्नॅचिंगच्या दोन घटना; सुमारे तीन लाखांचा ऐवज खेचून पळवला

अमृतधाम परिसरात चेन स्नॅचिंगच्या दोन घटना; सुमारे तीन लाखांचा ऐवज खेचून पळवला

– महिलांना ‘टार्गेट’ करण्याच्या घटना सुरूच…

पंचवटी – प्रतिनिधी
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमृतधाम व कोणार्कनगर परिसरात चेन स्नॅचिंगच्या दोन घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत इमारतीच्या लिफ्टमध्ये प्रवेश करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील
सोन्याचे गंठण ओरबडण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत घरासमोर मैत्रिणीसोबत गप्पा मारणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळवण्यात आले. यात एकूण दोन लाख ९५ हजारांचा ऐवज खेचून नेण्यात आला आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, सौ. अरुणा शशिकांत देशपांडे (वय ५९, रा. फ्लॅट नं ९, रमन हाईटस, परिसमणी गणपती मंदिराच्या समोर, अमृतधाम) या सायंकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावर असलेल्या घरी जाण्यासाठी लिफ्टमध्ये शिरत होत्या. यावेळी पाठीमागून आलेल्या ३० ते ३५ वयोगटातील युवकाने त्यांच्या गळ्यातील ३५ ग्रॅम वजनाचे व दोन लाख १० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण बळजबरीने खेचून घेतले व पलायन केले.

दुसऱ्या घटनेत उषा तेजराव पाटोळे (वय ४६, रा. रो हाऊस नं १, रोनक रो हाऊस, बालाजी रेसिडेन्सी जवळ, बालाजी चौक, कोणार्कनगर, आडगाव) या सायंकाळी ७.१५ वाजता घराच्या गेटच्या समोरील रस्त्यावर मैत्रिणीसोबत गप्पा मारत थांबल्या होत्या. तेव्हा तिथे आलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील ८५ हजार रुपये किंमतीचे व १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र व त्यातील दोन वाटया असा ऐवज खेचून पळ काढला. दोन्ही घटनांमधील संशयिताचे वर्णन सारखेच असून तो वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे, अंगाने सडपातळ, दंडाला तांबडे लाल रंगाचे चमकणारे पटटया असलेले जॅकेट अंगात घातलेले होते. आडगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून उपनिरीक्षक पंचमुख तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!