Homeक्राईमइंदिरानगर खुनातील संशयित २४ तासात जेरबंद; अहिल्यानगर 'एलसीबी' ची कामगिरी

इंदिरानगर खुनातील संशयित २४ तासात जेरबंद; अहिल्यानगर ‘एलसीबी’ ची कामगिरी

– प्रेयसीने सांगण्यावरून काढला काटा…

नाशिक – विशेष प्रतिनिधी
पाथर्डी फाट्यानजिकच्या गरवारे हाऊसच्या पाठीमागे संतोष काळे (वय ३४, रा. लेखानगर झोपडपट्टी, जुने सिडको) या ३४ वर्षीय बिगारी कामगाराचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना
आज शनिवारी (दि. १३) सकाळी उघडकीस आली होती. याबाबत इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासास प्रारंभ केला असता अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासाच्या आत यातील दोघा संशयितांना जेरबंद केले आहे. प्रेयसी पार्वती संतोष काळे हिच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याची संशयितांनी कबुली दिली आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, शनिवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास काळे यांचा मृतदेह आढळला होता. डोक्यात दगड घालून ठार मारल्याचे निदर्शनास येताच इंदिरानगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला होता. हा खून रात्री झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

रम्यान, इंदिरानगर पोलीस यातील संशयितांचा शोध घेत असताना अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) पथकाला यातील संशयित गावठाण बोल्हेगाव येथे असल्याची माहिती मिळाली. याबाबत वरिष्ठांना कळवल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एलसीबी’ चे वरिष्ठ निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक हरीश भोये, हवालदार भागवत, शिरसाट, ससाणे आदींच्या पथकाने प्रफुल दिलीप कांबळे (वय ३०, रा. गावठाण बोल्हेगाव, जि अहिल्यानगर) यास ताब्यात घेतले.

त्याची सखोल विचारपूस केली असता त्याने त्याची प्रेयसी पार्वती संतोष काळे हिच्या सांगण्यावरून त्याने आणि त्याचा साथीदार योगेश जाधव (रा. बोल्हेगाव) याच्या मदतीने संतोष काळे यास दारू पाजून त्याचे डोक्यात दगड घालून ठेचून खून केला असल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर योगेश जाधव यासही ताब्यात घेण्यात आले असून तिसरा साथीदार अल्पवयीन असून तो धवलगिरी (जि. अहिल्यानगर) येथील आहे. संशयितांचा ताबा इंदिरानगर पोलिसांकडे आल्यानंतर प्रफुल दिलीप कांबळे याची प्रेयसी पार्वती संतोष काळे हिचा या कटामागील हेतू स्पष्ट होणार आहे. संशयितांना सहायक निरीक्षक  तोडकर व पथक यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!