– शिवसेना नेत्यांसह मतदारांनी व्यक्त केला विश्वास
पंचवटी । विशेष प्रतिनिधी
शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या प्रभाग क्रमांक एक मधील विकासाचा आश्वासक चेहरा असणाऱ्या प्रविण जाधव यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या शिवसेना पॕनेलच्या चारही उमेदवारांच्या प्रचारास जोमाने प्रारंभ झाला आहे. शिवसेना नेत्यांच्या उपस्थित झालेल्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेना उमेदवारांच्या विजयाची नांदी ठरली.
राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख ना. एकनाथराव शिंदे यांनी प्रभागाच्या शाश्वत विकासासाठी प्रविणभाऊ रमेश जाधव (१ड), गणेशभाऊ चिंतामण चव्हाण (१ब), उर्मिलाताई सुनिल निरगुडे (१क), नयनाताई रविंद्र रामवंशी (१अ) यांना संधी देत प्रभागातील विजयाचा मार्ग मोकळा केला.

याप्रसंगी माजी खासदार हेमंत गोडसे, अनिल ढिकले, शिवाजी भोर यांनी प्रविण जाधव यांच्या कार्याचा गौरव केला. लोकप्रतिनिधी नसताना प्रविण जाधव यांनी प्रभागात केलेली कामे असो वा कोविड सारख्या संकटात नागरिकांच्या हाकेला धावून जाणे असो, यातून आपल्या सामाजिक सेवेचा ठसा उमटवल्याचे गौरवोद्गार काढले. प्रविण जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पॕनल निवडून द्या, गेल्या अनेक वर्षापासून वर्षांपासून केवळ कागदावर दिसणारा प्रत्यक्षात उतरवू असा विश्वास शिवसेना नेत्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी शिवाजी रघुनाथ शिंदे, अविनाश लोखंडे
सुनील निरगुडे, ललित गायकवाड, यशवंत कचेरीया, रमेश सोनवणे सर तसेच मतदार बंधू भगिनींनी मनोगत व्यक्त करताना प्रविण जाधव व सहकारी उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत यंदा परिवर्तन घडवू, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी आकाश कोकाटे यांनी सूत्रसंचलन केले तर अपूर्व पुरुषोत्तम शास्त्री यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी उपस्थित मतदारांनी खिचके ताण…धनुष्यबाण ! निवडून आण…धनुष्यबाण ! एकच वादा….प्रविण दादा ! यासारख्या घोषणा उत्स्फूर्तपणे देत परिसर दुमदुमून टाकला.


























