Homeक्राईममखमलाबादमध्ये भर रस्त्यावर शाळकरी मुलीचा विनयभंग

मखमलाबादमध्ये भर रस्त्यावर शाळकरी मुलीचा विनयभंग

पंचवटी – विशेष प्रतिनिधी
शाळा व महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या युवतींना हेरून त्यांची छेड काढण्याच्या घटना सातत्याने वाढत आहे. याबाबतीत कठोर उपाययोजना होत नसल्याने रोडरोमिओंनी शहरात उच्छाद मांडला आहे. मखमलाबाद परिसरात स्कूल व्हॅनची वाट बघणाऱ्या शाळकरी मुलीचे भररस्त्यात चुंबन घेत पळ काढला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी ‘पोस्को’ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी पिडीत मुलगी मखमलाबाद मधील मानकर मळा परिसरात शाळेत जाण्यासाठी स्कूल व्हॅनची वाट पहात उभी होती. यावेळी एका अनोळखी मुलाने मागून येऊन तिचे चुंबन घेत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व पळ काढला. यामुळे भेदरलेल्या पिडीतेने घरी जाऊन पालकांना या घटनेची माहिती दिली. पालकांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर भारतीय न्याय संहिता कलम ७४ व ‘पोक्सो’ कलम ८ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शाळांच्या वेळेत पोलीस व दामिनी पथकाची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अंकुश चिंतामणी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीमती तुरे तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!