Homeउत्तर महाराष्ट्रमहावितरणचा २० वा वर्धापनदिन; विद्युत सुरक्षा उपक्रमाचे आयोजन

महावितरणचा २० वा वर्धापनदिन; विद्युत सुरक्षा उपक्रमाचे आयोजन

नाशिक –
महावितरणच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘शुन्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन दि. १ ते ६ जून २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  या अंतर्गत नाशिक परिमंडळामध्ये सर्व विभागात विविध ठिकाणी गुरूवारी (दि. ५) विद्युत सुरक्षाविषयक जनजागृती रॅली काढण्यात आली यामध्ये महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विद्युत सुरक्षाविषयक फलक हाती घेत व घोषणा देत जनजागृती केली.

महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहर विभाग २ अंतर्गत कार्यकारी अभियंता जगदीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जेलरोड येथील विभागीय कार्यालय येथून सुरक्षाविषयक जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले यासोबतच नाशिक शहरामध्ये नाशिक शहर विभाग १ अंतर्गत निमा हाऊस, सातपूर येथून दुचाकी वाहन रॅली काढण्यात आली. यामध्ये सातपूर व सिडको उपविभागतील अतिरिक्त कार्यकारी अभियंते, सहाय्यक अभियंते व जनमित्र यांचा सहभाग होता.
चांदवड येथे विभागीय कार्यालय व उपविभागीय कार्यालय यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी व जनमित्र यांच्या सहभागातून रॅली काढण्यात आली. नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता राजेश थूल आणि कार्यकारी अभियंता केशव काळूमाळी यांच्या नेतृत्वाखाली रॅलीमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांना विद्युत सुरक्षेचा जागर केला. तसेच मालेगाव मंडळातील सर्व विभागांमध्ये अधिक्षक अभियंता जगदीश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली काढण्यात आली. विद्युत सुरक्षा सप्ताहादरम्यान सुरक्षाविषयक कार्यशाळा,  मॅरेथॉन, रॅली, निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून ग्राहकांना सुरक्षाविषयक ई-मेल व एसएमएस  पाठविण्यासोबतच भित्तीपत्रके, चित्रफिती अशा विविध माध्यमांव्दारे विद्युत सुरक्षेविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

दि.६ जून २०२५ रोजी महावितरण कंपनीचा २० वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्ताने उद्या राज्यासह नाशिक परिमंडळातील महावितरणच्या सर्व कार्यालयांमध्ये सकाळी १० ते १० वाजून १५ मिनिटे यावेळेत एकाच वेळी सुरक्षा विषयक शपथ घेण्यात येणार आहे. यामध्ये महावितरणचे सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र यांचा सहभाग असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!