Homeक्रीडानाशिक जिल्हा टेनिस संघटना राज्यात सर्वोत्कृष्ट; राज्य लॉन टेनिस संघटनेची...

नाशिक जिल्हा टेनिस संघटना राज्यात सर्वोत्कृष्ट; राज्य लॉन टेनिस संघटनेची घोषणा

नाशिक – क्रीडा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना ‘एमएसएलटीए’ यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या  सर्वोत्कृष्ट टेनिस संघटना पुरस्कार नाशिक जिल्हा टेनिस संघटनेस जाहीर झाला आहे. रुपये पंचवीस हजार व प्रशस्ती पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. खेळाडू बरोबरच जिल्हा संघटनांची गुणवत्ता सुधारावी व अधिक  कार्यक्षम व्हावे म्हणून हा पुरस्कार गेल्या तीन वर्षा पासून देण्यात येतो.

जिल्हा संघटनेचे कार्य, टेनिस खेळाचा प्रसार होण्या साठी केले गेलेले प्रयत्न, वर्षभरात किती स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. त्याच प्रमाणे टेनिस विषयी कार्यशाळा, शिबिरे, प्रसिद्धी, संघटनेचे अखिल भारतीय टेनिस संघटना, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना व राज्य संघटना यांच्या मार्गदर्शक सूचना व नियमाप्रमाणे कार्य करणारी संघटना म्हणून नाशिक जिल्हा संघटनेस २०२४-२५ या वर्षीचा पुरस्कार राज्य संघटनेच्या
मुंबई येथे आयोजित राज्य संघटनेच्या कार्यकारी सभेमध्ये जाहीर करण्यात आला.

याप्रसंगी राज्य संघटना अध्यक्ष प्रशांत सुतार, कार्याध्यक्ष भरत ओझा, मानद सचिव सुंदर अय्यर यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत नाशिक जिल्हा टेनिस संघटना अध्यक्ष राजीव देशपांडे आणि नाशिक जिल्हा संघटनेचे ही विशेष अभिनंदन करण्यात आले. या पूर्वी सोलापूर आणि नागपूर जिल्हा संघटनांना हा सन्मान मिळाला आहे. या बद्दल महाराष्ट्र क्रीडा राज्य मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमाताई हिरे, क्रीडा युवक सेवा संचालय उप संचालक स्नेहल साळुंखे कुदळे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील , जिल्हा संघटनेचे अद्वैत आगाशे, डॉ पुष्कर लेले, समीर कपूर, डॉ.संजय पिचा, विभाग समन्वयक राकेश पाटील तसेच नाशिक,जिल्हा संघटनेचे माजी पदाधिकारी डॉ हेमंत कोतवाल, दिपक पटेल, गोविंद बेळे, सुभाष जोशी, जळगाव धुळे नंदुरबार जिल्हा टेनिस संघटना, विविध क्रीडा संस्था, संघटनांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!