Homeक्राईमफुलेनगरात दोन गटात हाणामारी; गोळीबारामुळे तणाव

फुलेनगरात दोन गटात हाणामारी; गोळीबारामुळे तणाव

पंचवटी – विशेष प्रतिनिधी
पेठरोडवरील फुले नगरातील मुंजोबा चौक परिसरात भंडारा प्रसाद व जागरण कार्यक्रम सुरु असताना मंगळवारी मध्यरात्री मागील भांडणावरून दोन गटात हाणामारी झाली. यात गोळीबारही करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता. या हाणामारीचे वृत्त समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी व पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी दोन्ही गटातील युवकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यातील काही संशयित रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहीत खंडु गांगुर्डे टोळीतील प्रेम दयानंद महाले, सुमित दयानंद महाले, प्रेम संतोष मिरके तसेच विरोधी विशाल भालेराव टोळीतील विकी विनोद वाघ, ऋषीकेश गणेश परसे उर्फ बाबा, जय संतोष खरात, जय मोरे उर्फ टींगरी तुंडया जाधव व इतर ८ ते १० यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या हाणामारीचे वृत्त समजताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त संगिता निकम, शेखर देशमुख, पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, फुलेनगर मधील मुंजोबा महाराज मंदीरात मंगळवारी सायंकाळी
भंडारा प्रसाद व जागरण असा धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमा करीता आमचे चाळीतील व परिसरातील सर्व नागरीक व महिला जमलेले होते. सदर कार्यक्रमा दरम्यान मुंजोबा महाराजाचे दर्शन व महाप्रसादाचे वाटप रात्री ०१.३० वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर मंदीरासमोर देवाचे जागरणाचा कार्यक्रम सुरू होता व चाळीतील सर्व नागरिक मंदिराच्या आवारात हजर होते.

यावेळी भालेराव टोळीतील विकी विनोद वाघ, ऋषीबाबा परसे, जय संतोष खरात, जय मोरे उर्फ टिंगरी, तुंड्या दादु व इतर साथीदारांनी मागील भांडणाचा वाद उकरून काढून जोरजारात शिवीगाळ करून घरांवर दगडफेक करू लागले तसेच काचेच्या बाटल्या फेकून मारू लागले. तुफान आरडाओरडा करून परिसरात दहशत निर्माण केली. ‘तुमचा गेम’ च करतो असे सांगून त्याच्या जवळ असलेले अग्नीशस्त्राने गोळीबार केल्याने उपस्थित नागरिक भितीने सैरावैरा पळू लागले. लोकांनी पटापट घरे बंद करून घेतले तसेच जागरणाकरीता जमलेले लोक गल्लीबोळातून भितीने सैरावैरा धावत सुटल्याचे, सुमित दयानंद महाले याने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!