Homeक्राईमदुबई प्रवासासाठी विमानाचे बनावट तिकीटे; चौधरी यात्रा कंपनीला लाखोंचा गंडा घालणारा...

दुबई प्रवासासाठी विमानाचे बनावट तिकीटे; चौधरी यात्रा कंपनीला लाखोंचा गंडा घालणारा पुण्यात जेरबंद

– गुंडा विरोधी पथकाची कामगिरी…

नाशिक – विशेष प्रतिनिधी
मुंबई ते दुबई विमान प्रवासाची बनावट तिकीटे देऊन शहरातील प्रख्यात चौधरी यात्रा कंपनीला सुमारे वीस लाखांना गंडा घालणारा संगमनेर येथील तेजस शशीकांत वैष्णव (वय-३१) यास पुणे शहरातील विरभद्र नगर (बाणेर) येथून जेरबंद करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अत्यंत कौशल्याने ही कारवाई केली.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, चौधरी यात्रा कंपनीचे संचालक सत्यनारायण रामनिवास चौधरी यांनी दिनांक १६ जानेवारी ते दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान मुंबई ते दुबई व अबुधाबी ते मुंबई अशा यात्रेचे आयोजन केले होते. एकूण ५० यात्रेकरु या प्रवासाला जाणार असल्याने प्रवाशांनी चौधरी यात्रा कंपनीला पूर्ण रक्कम आगावू जमा केली होती. यातील यात्रेकरु यांचे मुंबई ते दुबई विमान तिकीटे काढण्यासाठी चौधरी यात्रा कंपनीने माईल स्टोन हॉलीडेज प्रा.लि. संगमनेर जि. अहिल्यानगर यांना १०,८२,५००/- रुपये रक्कम बँक खात्याद्वारे दिले होते.
त्याप्रमाणे माईल स्टोन हॉलीडेज प्रा.लि. यांनी ५० प्रवाशांचे एअर इंडिया व इंडिगो विमानाचे तिकीटे चौधरी यात्रा कंपनीस पाठविले.

दिनांक १६ जानेवारी रोजी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दुबई जाण्यासाठी ५० प्रवासी गेले असता फक्त ४ विमान तिकीटे विमानतळाचे सिस्टीमवर स्कॅनींग झाली व उर्वरीत ४६ तिकीटे दिसून आली नाही. त्यामुळे ही यात्रा रद्द करण्यात इली. माईल स्टोन हॉलीडेज प्रा.लि. कंपनीने विमानाचे बनावट तिकीटे काढल्यामुळे चौधरी यात्रा कंपनीची बदनामी झाल्याने माईल स्टोन हॉलीडेज प्रा.लि. कंपनीने चौधरी यांचा यात्रा आयोजनासाठी झालेला खर्च व प्रवाशांना परत करावी लागलेली रक्कम अशी एकुण १९,८२,५००/- रुपयाची फसवणुक केल्याने सायबर पोलीस ठाण्यात नाशिक फसवणुकीचा गुन्हा नोंदवला होता. या संवेदनशील गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्याबाबत पोलीस आयुक्त
संदीप कर्णिक यांनी गुंडा विरोधी पथक आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असतांना गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की, गुन्हयातील संशयित तेजस वैष्णव हा पुणे येथे माईल स्टोन हॉलीडेज प्रा.लि. कंपनीचे काम करत आहे. ही माहिती मिळाल्यानंतर गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव हे तात्काळ पुणे येथे रवाना झाले.

दिनांक २४/०९/२०२५ रोजी गुंडा विरोधी पथकाने पुणे येथे परदेशामध्ये जाण्यासाठी तिकीट विकी करणाऱ्या यात्रा कंपनी यांना भेटून माईल स्टोन हॉलीडेज प्रा.लि. कंपनीचे संचालक हे पुणे येथे कोणत्या परिसरात काम करतात बाबत माहिती घेतली. तेव्हा तेजस वैष्णव हा बानेर व बावधान या परिसरात फिरस्ता असून त्याचे ऑफीस संगमनेर जि. अहिल्यानगर येथे आहे. त्यानुसार गुंडा विरोधी पथकाने मानवी व तांत्रिक कौशल्य गुन्हयातील संशयित तेजस शशीकांत वैष्णव यास विरभद्र नगर (बाणेर, पुणे) येथून शिताफीने ताब्यात घेतले. त्यास सायबर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, सुनिल आडके, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे, सुनिता कवडे यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!