Homeक्रीडागुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी अपघातग्रस्त विमानात ?

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी अपघातग्रस्त विमानात ?

अहमदाबाद –
येथील विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी उड्डाण केलेले एअर इंडियाच्या एआय-१७१ (बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान – सीरियल नंबर ३६२७९) हे प्रवासी विमान काही क्षणातच नागरी वस्तीवर कोसळले. या अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रमणिकलाल रुपानी यांचा समावेश असून त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप काहीही वृत्त समजलेले नाही. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

अपघाताचे वृत्त समजताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने अहमदाबादकडे निघाले आहेत. तसेच अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. अहमदाबादमधील रुग्णालयांना अलर्टचा इशारा देण्यात आला असून खासगी डॉक्टरही सरकारी रुग्णालयात सेवा देण्यासाठी हजर झाले आहेत.

अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमेजवळच ही दुर्घटना घडली आहे. अपघातानंतर ज्वाळा व धुरांचे लोट लांब अंतरावरूनही दिसत असून तातडीने बचाव कार्यास प्रारंभ झाला आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे नाव असलेला बोर्डींग पास तसेच प्रवाशांची यादी सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अपघातग्रस्त विमानात प्रवासी व क्रू मेंबर असे २४२ जण असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या अपघाताची भीषणता वाढली आहे. अहमदाबाद विमानतळानजिक असलेल्या मेघानी नगर परिसरात हे विमान कोसळल्याचं वृत्त आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झाला असून ही खूप मोठी दुर्घटना असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेत किती हानी झाली आहे हे अद्याप समजलेलं नाही.

एअर इंडियाच्या एआय-१७१ (बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान – सीरियल नंबर ३६२७९) या प्रवासी विमानाचा अपघात झाला आहे. २४२ प्रवाशांना घेऊन हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होतं. तसेच यात दोन पायलटसह १२ क्रू सदस्य होते. या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्या काहीच मिनिटात (७ किमी दूर) ते कोसळलं. विमानाचे पंख तुटून बाजूला पडल्याचं व्हिडीओंमध्ये दिसतंय. दरम्यान, अहमदाबाद पोलीस व अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!