नाशिक – विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने खेळाडूंच्या प्रगतीसाठी विविध योजना सुरू केले आहेत. या योजनांचा फायदा घेऊन जिल्ह्यातील खेळाडूंनी आपल्या खेळात प्रगती करून नाशिकचे नाव उज्वल करावे असे असे आवाहन विभागीय क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंखे यांनी केले.
मित्रविहार क्लब, माजी खेळाडू आणि नाशिक जिल्हा व्हॉलीबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या १७ वर्षे वयोगटातील व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले आहे. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील (धुळे), जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे मित्रावर क्लबचे उपाध्यक्ष जगन्नाथ सांगळे व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष रामदास होते व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी जिल्हास्तरीय आंतर शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन मित्र विहार क्लब येथे करण्याचे जाहीर केले. मित्र विहार क्लबचे उपाध्यक्ष जगन्नाथ सांगळे यांनी मित्रविहार क्लब या संस्थेची माहिती देऊन व्हॉलीबॉल खेळासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याकरता नेहमीच सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली. या स्पर्धेत मुलांचे दहा संघ तर मुलींचे बारा संघ सहभागी झाले असून स्पर्धा दिवसा आणि रात्री विद्युत प्रकाश झोतात खेळवल्या जाणार आहेत.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माजी खेळाडू राजू शिंत्रे, कळहिरामण वाकचौरे, विजय देवरे, सुरज ठाकूर, सुनील कन्सारा, बाळू भडके, प्रमोद जाधव राहुल पवार, विजय शिरसाठ आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक अविनाश खैरनार परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक नितीन अहिराव यांनी केले.

























