Homeधार्मिककुंभमेळा काळात पुरोहित संघाबरोबर पोलिसांची समन्वयाची भूमिका राहील - पोलिस आयुक्त संदीप...

कुंभमेळा काळात पुरोहित संघाबरोबर पोलिसांची समन्वयाची भूमिका राहील – पोलिस आयुक्त संदीप कर्णिक

पंचवटी – विशेष प्रतिनिधी
पुरोहित संघाबरोबर पोलिसांची सतत समन्वयाची भूमिका राहील आणि आगामी कुंभमेळा काळात
दोघेही हातात हात घालून काम करू, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले. श्रीगंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघासमवेत पोलिस आयुक्त कर्णिक यांची समन्वयक बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते.

नवनिर्वाचित पुरोहित संघाच्या कार्यकारणीचे कर्णिक यांनी स्वागत केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तीर्थावर तसेच कुंभमेळा काळात येणाऱ्या भाविकांसाठी चांगल्या सुविधा कशा देता येतील, त्याचे नियोजन कसे करता येईल व गोदाप्रेमींना ते कसे सुखावह ठरेल तसेच कुंभमेळा निर्विघ्नपणे संपन्न व्हावा यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याबाबतही बैठकीत विस्तृत चर्चा झाली. 

पोलीस आयुक्त कर्णिक यांनी पुरोहित संघाच्या सदस्यांच्या सूचना जाणून घेऊन काही मुद्द्यांचे तत्काळ निरसन केले. कुंभमेळा काळात कायदा व सुव्यवस्थेची योग्य ती काळजी घेतली जाईल, असे आश्वासनही कर्णिक यांनी यावेळी दिले. बैठकीस नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, उपाध्यक्ष वेदमूर्ती शेखर शुक्ल, नितीन पाराशरे व निखिल देव, संघटक धनंजय बेळे, कोषाध्यक्ष वैभव क्षेमकल्याणी, चैतन्य गायधनी, अमित पंचभैये, अमित गायधनी, सदानंद देव, राहुल अगस्ते, उपेंद् देव, सौरभ गायधनी, मंदार देव, माणिक शिंगणे आदी पदाधिकारी तसेच पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण,सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके व कुंभमेळा कक्षाचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!