Homeक्राईमदहा वर्षीय बालिकेवर अत्याचार; नराधमास सात वर्ष सक्तमजुरी

दहा वर्षीय बालिकेवर अत्याचार; नराधमास सात वर्ष सक्तमजुरी

नाशिक – विशेष प्रतिनिधी
दहा वर्षीय बालिकेस रस्त्यात अडवून घरामागे नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तसेच पोलिसांना सांगितल्यास आईसह मारून टाकण्याची धमकी देणारा नराधम ज्ञानेश्वर त्रंबक पाटील उर्फ पाटील बाबा (वय ५७, रा. एन ३२ आर १/५/२ मुक्तानंद शाळेजवळ, महाराणा प्रताप चौक, सिडको) यास न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

जिल्हा व सत्र न्यायालय (क्रमांक ७) न्यायाधीश
श्रीमती पी. व्ही. घुले यांनी बुधवारी हा निकाल दिला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती लीना चव्हाण व श्रीमती सुप्रिया गोरे यांनी पुराव्याची मुद्देसुद मांडणी व युक्तीवाद करून प्रभावीपणे कामकाज करत आरौपीला शिक्षेप्रत पोहचवले.

सदरचा गुन्हा नाशिक पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील, अंबड पोलीस ठाणेच्या हददीत, दि.०२/०८/२०२२ रोजी व दि. ०५/०८/२०२२ रोजी सायंकाळी एन ३२ आर/२/९/२ या घराचे पडवी मध्ये, महाराणा प्रताप चौक, सिडको, नाशिक येथे घडलेला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, यातील पिडीता ही वय ९ वर्ष ९ महिने वयाची असताना दोन व पाच अॉगस्ट रोजी सायंकाळी घरासमोरून जात असताना आरोपी ज्ञानेश्वर त्रंबक पाटील उर्फ पाटील बाबा याने रस्त्यात अडवले. पिडीता रहात असलेल्या घराचे पाठीमागे आड बाजुला नेवून, तिचेवर लैंगिक अत्याचार केला तसेच तुला वडील नाहीत आणि तु जर हा प्रकार तुझे आईला सांगितल्यास, तुला व तुझे आईला मारून टाकेन, व पोलीसांना सांगितले तर तुझे घरातील सर्वांना संपूवन टाकीन अशी धमकी दिली. याप्रकरणी पिडीतेच्या आईने तक्रार दिल्यानंतर आरोपी विरुध्द अंबड पो. ठाण्यात भादंवि कलम ३७६ (२), ५०६, सह बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ६,८,१२, सह अनु. जाती जमाती अधिनियम कायदा कलम 3(1)(W)(1)(II)3(2)(V) (VA) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

या गुन्हयाचा तपास सहाय्यक आयुक्त सोहेल शेख यांनी केलेला असून त्यांनी आरोपीविरुध्द सबळ पुरावे गोळा करून, गुन्हा शाबीत होण्याचे दृष्टीने मेहनत घेऊन अतिशय चिकाटीने तपास केला व आरोपी विरूध्द जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान गुन्हयातील आरोपीविरूद् फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थिीतीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीतास सीआरपीसी कलम २३५ (२) अन्वये शिक्षा सुनावलेली आहे. अभियोग कक्षाचे उपनिरीक्षक अतुल पाटील, हवालदार आर.बी.आजगे, कोर्ट अंमलदार हवालदार राजश्री बोंबले यांनी या गुन्हयात शिक्षा लागण्याच्या दृष्टीने वेळोवेळी पाठपुरावा केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!