नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरातील मन्सूरी पिंजारी नदाफ समाजाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही “गुणगौरव सोहळा” उत्साहात आयोजित करण्यात आला. हा सोहळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशास सामाजिक मान्यता देण्याच्या उदात्त उद्देशाने पार पडला, ज्यामध्ये १५० प्रतिभावान विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, स्मृतीचिन्हे व शैक्षणिक बॅग देऊन गौरविण्यात आले. जलसा हॉल, अशोका मार्ग नाशिक येथे हा कार्यक्रम पार पडला. यात शालेय ते उच्चशिक्षणात उत्कृष्ट गुणांनी यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना समाजाने प्रोत्साहित केले.
सोहळ्याचे अध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश मंसूरी पिंजारी समाज अध्यक्ष अरिफ आली मन्सूरी यांनी भूषविले. त्यांनी विद्यार्थ्यांना “शिक्षण हेच समाजप्रगतीचे मूलमंत्र” असा प्रेरणादायी संदेश दिला. कार्यक्रमाला हाजी कलीम मन्सूरी, हाजी रोशन मन्सूरी, संदीप विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुलाखे सर, नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड, संजय चव्हाण (अप्पा), सलीम शेख, पप्पू शेख, जैनुदिन मन्सूरी, इरफान मन्सूरी, करिअर मार्गदर्शक असिफ सर सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक मन्सूरी पिंजारी नदाफ समाज अध्यक्ष ऐनोद्दीन मन्सूरी यांनी केले.
या प्रसंगी हाजी असलम मन्सूरी, खलील मन्सूरी, रशीद पिंजारी, फारूक मन्सूरी, ऍड. वासिम मन्सूरी, सरदार पिंजारी, इस्माईल पिंजारी, अलाऊदीन पिंजारी, तन्वीर मन्सूरी, मंजूर मन्सूरी, शरीफ मन्सूरी, जाकीर मन्सूरी, रफिक मुजावर, सुबान पिंजारी, अशपाक पिंजारी तसेच सर्व तालुका अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी सोहळ्याला यशस्वी बनवण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले, तसेच या कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.

























