नाशिक – विशेष प्रतिनिधी
शिवसेना (ठाकरे गट) महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने अजीमभाई सैय्यद यांचे नेतृत्वात २०६ शालेय वाहनांचा पासिंग मेळावा शनिवारी (दि. १३ ) घेण्यात आला. यामुळे चालक व मालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात शालेय वाहतूकदारांच्या ‘ स्पीड गव्हर्नर’ च्या अडचणी संदर्भात बंद असलेले कामकाज शनिवारपासून संघटनेच्या प्रयत्नामुळे यशस्वीरित्या चालू झाले. मेळावा उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे शिवसेना उपनेते दत्ता नाना गायकवाड, उपजिल्हाप्रमुख भैय्या मणियार, उप महानगर प्रमुख गोरख वाघ, जिल्हा सचिव मसूद जिलानी, उपशहरप्रमुख संजय चिंचोरे, हरिभाऊ काळे, शैलेश सूर्यवंशी, युवा नेते राहीलभाई सैय्यद आदी उपस्थित होते. या मेळाव्यासाठी नाशिक परिवहन विभागाने सुट्टीचा दिवस असूनही सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी मेहनत घेतली.


























