Homeउत्तर महाराष्ट्र‘वसुंधरेच्या संवर्धनासाठी’ गो ग्रीन सेवेचा पर्याय

‘वसुंधरेच्या संवर्धनासाठी’ गो ग्रीन सेवेचा पर्याय

  • नाशिक –
    दरमहा छापील कागदी बिला ऐवजी ई – मेल द्वारे वीज बिल स्वीकारण्याच्या गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर ग्राहकांना तत्काळ वीज बिलात एकरकमी १२० रुपये सूट महावितरणकडून दिली जात असून वसुंधरेच्या संवर्धनासाठी ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडावा, असे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे.
    महावितरणकडून ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेनुसार गो-ग्रीन सेवा राबविण्यात येत आहे. गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा छापील कागदी बिला ऐवजी ई – मेल द्वारे वीज बिल पाठविण्यात येते. शिवाय पहिल्याच वीज बिलात पुढील बारा महिन्यासाठी तत्काळ १२० रूपये एकरकमी सवलत देण्यात येते.
    महावितरणच्या राज्यातील तीन कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्यापपर्यंत ६ लाख १६ हजार ग्राहक यांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडला आहे. यात नाशिक मंडळातील २५ हजार ३५३, मालेगाव मंडळातील ४ हजार ९४ आणि अहिल्यानगर मंडळातील १९ हजार ६ वीज ग्राहक म्हणजे नाशिक परिमंडळातील एकूण ४८ हजार ४५३ ग्राहकांनी गो-ग्रीन सेवेचा लाभ घेतला आहे. भविष्यात हे प्रमाण वाढावे, या हेतूने महावितरणने गो ग्रीन पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात तत्काळपणे १२० रुपये एकरकमी सूट देण्याचा निर्णय घेतला. सर्व नोंदणीकृत वीज ग्राहकांना महावितरणकडून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडण्यासाठी एसएमएस पाठविण्यात आले आहेत. गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्यात येत आहे. त्यानंतर पुढील वर्षभर व सेवेसाठी नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणीकृत ई-मेलवर वीज बिल पाठविण्यात येणार असून त्यापुढे दरमहा वीज बिलात १० रुपये सूट देण्यात येणार आहे.  ग्राहकांनी  वसुंधरेच्या संवर्धनासाठी या योजनेचा लाभ  घेण्याचे महावितरणने आवाहन केले आहे. गो ग्रीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळाला भेट द्या व गो ग्रीन चा पर्याय निवडा.
    —————————————————-महावितरणचे आवाहन

    नाशिक  परिमंडलातील ग्राहकांना सरळ सोप्या पद्धतीने गो-ग्रीन नोंदणी कशी करावी तसेच गो-ग्रीन नोंदणी केल्यानंतर मिळणारे फायदे दर्शविणारे पोस्टर्स तयार करण्यात आले आहे. सदर पोस्टर्सवर गो ग्रीन माहिती व सोबत या संदर्भातील व्हिडीओचा क्यूआर कोड देण्यात आलेला आहे. ग्राहकांनी मोबाईल च्या माध्यमातून सदर क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर चित्रफितीच्या माध्यमातून गो-ग्रीन नोंदणी कशी करावी या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. सदर पोस्टर्स महावितरणच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्राच्या परिसरात तथा शहरातील कार्यालयात लावण्यात आलेले असून विद्युत ग्राहकांनी सदर पोस्टर्स वरील क्यूआर कोड मोबाईल द्वारे स्कॅन करून चित्रफितीद्वारे दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने गो-ग्रीन नोंदणी करावी. वीजबिलासाठी ई-मेल व एसएमएस चा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दर महीन्याला प्रत्येक वीजबिलामागे १० रूपयाची सुट देण्यात येत असून इतरही ग्राहकांनी गो-ग्रीन योजनेत सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाचा व सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!