Homeशहर व जिल्हारोटरी क्लब ऑफ नाशिकचा पदग्रहण; अध्यक्षपदी डॉ. गौरव सामनेरकर तर सचिवपदी सीए...

रोटरी क्लब ऑफ नाशिकचा पदग्रहण; अध्यक्षपदी डॉ. गौरव सामनेरकर तर सचिवपदी सीए रेखा पटवर्धन

नाशिक – विशेष प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या नूतन कार्यकारिणीचा शानदार पदग्रहण समारंभ संस्थेच्या गंजमाळ येथील सभागृहात गुरुवारी (दि. १०) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रोटरीचे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे तसेच पुण्याच्या माजी प्रांतपाल मंजू फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला.

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. अनन्या सामनेरकर यांनी गणेश वंदना सादर केली. माजी अध्यक्ष ओमप्रकाश रावत यांनी गतवर्षात केलेल्या उपक्रमांच्या सामाजिक कार्याचा अहवाल सादर केला. गेल्या ८० वर्षांपासून कार्य करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ नाशिकचे कार्य कौतुकास्पद आहे. ही संस्था राबवित असलेले उपक्रम पाहून मनस्वी आनंद वाटतो. रोटरीच्या संस्कारातच माझी वाढ झालेली असून, त्यामुळेच आपण या पदापर्यंत पोहोचलो. कोणावर सत्ता न गाजविता आपण सेवाभाववृत्तीने एकजुटीने काम केले पाहिजे, असे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांनी सांगितले.

सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या नाशिक रोटरीचे काम वाखाणण्याजोगे आहे. म्हणूनच ह्या क्लबमध्ये सामावून घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणत वाढताना दिसतेय असे पुण्याच्या माजी प्रांतपाल मंजू फडके यांनी सांगितले. रोटरी क्लब ऑफ नाशिकचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश रावत यांच्याकडून नूतन अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली. तसेच सीए रेखा पटवर्धन यांनी सचिव तर आर्किटेक मकरंद चिंधडे यांनी सहसचिव पदाचा पदभार स्वीकारला. नवीन कार्यकारिणी सदस्यांना व्यासपीठावर आमंत्रित करून त्यांचेही स्वागत करण्यात आले.
यावेळी मावळते अध्यक्ष ओमप्रकाश रावत, सचिव शिल्पा पारख, हेमराज राजपूत, अनिल सुकेणकर, मंगेश अपशंकर, स्मिता अपशंकर, डॉ. श्रिया कुलकर्णी, निलेश सोनजे, विजय दिनानी, शशिकांत पारख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली चिंधडे यांनी केले तर सीए रेखा पटवर्धन यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंथ लीडर भरत बिरारी, रोहित देशपांडे, लीना भाकरे, सोनल कोटकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!