Homeशहर व जिल्हामखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसल जवळील सिग्नल परिसरात कमान कोसळली

मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसल जवळील सिग्नल परिसरात कमान कोसळली

– मोठा अनर्थ टळला….

पंचवटी – प्रतिनिधी
शहरात शारदीय नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू असून आणि येणाऱ्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने आजी – माजी लोकप्रतिनिधींसह भावी इच्छुक उमेदवारांसह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व सामजिक कार्यकर्ते यांनी पंचवटी विभागात जागोजागी फलक व भव्य दिव्य अशा कमानी उभ्या केल्या आहेत. यातच बुधवार (दि.२४) रोजी दुपारच्या सुमारास मखमलाबाद रोडवरील ड्रिंम कॅसल चौकातील सिग्नल जवळील एका बाजूची कमान कोसळल्याची घटना घडली आहे. यात दोन ते तीन जण जखमी झाल्याचे समजते. दरम्यान कमान तुटल्याने या चौकातील हाय मास्टचे देखील नुकसान झाले आहे.

शहरात सध्या नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पंचवटी परिसरासह शहराच्या विविध भागात आजी माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जागोजागी फलक लावलेले आहेत. त्याचप्रमाणे मतदारांना व पक्षातील नेत्यांना आकर्षित व खुश करण्यासाठी आजी माजी नगरसेवकांनी भव्य दिव्य अशा कमानी उभारल्या आहेत. यातून प्रभागातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंचवटी विभागात चौका चौकात, नाक्यांवर, कॉर्नर, विविध कॉलनी परिसर आणि मुख्य रस्त्यांच्या आजुबाजूला कमानी उभ्या केल्या आहेत. बुधवारी (दि. २४) रोजी दुपारच्या सुमारास मखमलाबाद रोडवरील ड्रिंम कॅसल सिग्नल चौकात असलेली प्रभाग क्रमांक पाचचे भाजपाचे माजी नगरसेवक कमलेश बोडके यांची कमान कोसळली. या घटनेत दोन तीन जण जखमी झाल्याचे समजते. संबंधिताना जखमी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते. याबाबत भाजपाचे माजी नगरसेवक कमलेश बोडके यांना संपर्क साधला असता सदर घटनेबाबत विचारले असता कमान ही हाय मास्ट पोलावर कलली होती यात कोणीही जखमी झाले नसून सदर कमान उतरवून घेतली असल्याचे सांगितले.

मोठा अनर्थ टळला….

गत वर्षी मुंबईतील घाटकोपर भागात कमान कोसळून सोळा जणांचा मृत्यू तर ७५ हून अधिक जण जखली झाले होते. त्यानंतर नाशिक शहरातील कमानी व फलकांचे ऑडिट झाले होते. मात्र , विविध सण उत्सवा वेळी विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी , सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात फलकबाजी करताना दिसून आले आहे. यात विविध भागात भव्य दिव्य अशा कमानी उभारल्या आहेत. या कमानी उभ्या करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसल जवळील कोसळलेल्या कमानीने दिसून आले आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!