चेन्नई –
तामिळनाडू मधील करूर येथे सिने अभिनेता थलपती विजय याच्या भव्य रॕलीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. रॕलीमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी झाल्याने घडलेल्या चेंगराचेंगरीत ११ हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जखमी झाले आहेत. करूर येथे प्रचंड गोंधळाचे वातावरण असून मृतांचा आकडा अधिक वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.

‘टॉलीवूड’ मधील प्रख्यात सिने अभिनेता थलपती विजय याचा ‘टीव्हीके’ अर्थात तामिलगा वेत्री कझगम नावाचा राजकीय पक्ष असून या पक्षाची बांधणी तामिळनाडू व पॉँडेचरीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या पक्षाची स्थापना २ फेब्रुवारी २०२४ मध्ये झाली असून थलपती विजय यास मोठा प्रतिसाद लाभत आहे. पक्षाच्या प्रचारासाठी करूर येथे आयोजित रॕलीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.




























