Homeशहर व जिल्हाशहरातील खड्डयांच्या प्रश्नावर शिवसेना ठाकरे गट आक्रमक

शहरातील खड्डयांच्या प्रश्नावर शिवसेना ठाकरे गट आक्रमक

नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरातील सर्वच रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ‘सेल्फी विथ खड्डा’ या अभिनव आंदोलनाला प्रारंभ केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने थेट महापालिका मुख्यालयात धडक मारली. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका अन्यथा महापालिकेच्या राजीव गांधी भवनासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महापालिका अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील खड्डयाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.
या निवेदनाचा आशय असा, नाशिक हे स्मार्ट सिटी अंतर्गत निवडले गेलेले एक प्रमुख शहर असूनसुद्धा सध्या शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. नाशिक रोड, पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, सातपूर, सिडको या विभागीय मनपा कार्यालयाच्या हद्दीतील प्रमुख रस्त्यांवर व शहराच्या अंतर्गत कॉलनी रस्त्यांवर असंख्य खड्‌डे पडलेले आहेत.

या रस्त्यांची अवस्था इतकी भयावह आहे की, खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे हेच समजेनासे झाले आहे. खड्यांमध्ये पावसाचे पाणी भरल्यामुळे ते दिसत नाहीत, त्यामुळे अपघात होत आहेत. अनेक ठिकाणी नागरिक जखमी झालेले असून काही गंभीर घटनाही घडलेल्या आहेत. ही परिस्थिती पाहता नागरिकांना जीव गमवण्याची भिती आहे. महानगरपालिकेच्या हद्दीतील राज्य महामार्गांचीही अवस्था वेगळी नाही. रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून, यामुळे नाशिककरांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ‘सेल्फी विथ खड्ड’ या जनजागृती आणि निषेधात्मक आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील खड्ड्यांचे फोटो काढून #SelfieWithKhadda हॅशटॅगसह सोशल मीडियावर पोस्ट करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे.

आम्ही मागणी करतो की, नाशिक शहरातील सर्व प्रभागांतील प्रमुख रस्ते व कॉलनी रस्ते तसेच महापालिका हद्दीतील महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत. या कामांसाठी ठराविक मुदतील कार्यवाही होऊन, लवकरात लवकर परिणाम दिसावा. ज्यांच्या मुळे रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे त्या ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केले असेल अशांना त्वरीत काळ्या यादीत टाकण्यात यावे. जर हे खड्‌डे बुजवले गेले नाहीत, तर ‘सेल्फी विथ खड्डा’ च्या पुढील टप्प्यात ‘राजीव गांधी भवनवर तीव्र आदोलन केले जाईल.

याप्रसंगी शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे, माजी आमदार वसंत गिते, मसुद जिलानी, बाळासाहेब कोकणे, राहूल दराडे, सचिन बांडे, शैलेश सूर्यवंशी, दिलीप मोरे, नंदू वराडे, शरद दातीर, विरेंद्रसिंग टिळे, रितेश साळवे, सुभाष शेजवळ, प्रविण चव्हाण, ऋषी वर्मा, संजय गोसावी, धनंजय गवळी, रविंद्र गामणे, संदेश फुले, योगेश गाडेकर, देवा जाधव, महेंद्र आढाव, उत्तम कोठुळे, सुमंत कारवाळ, रणजित हिंगमिरे, किशोर दिघे, शाम कंगले, सुनील भालेकर, सुनील निरगुडे, महेंद्र आव्हाड, प्रमोद नाथेकर, महिला आघाडीच्या भारती ताजनपुरे, स्वाती पाटील, किर्ती जावडेकर, शोभा पवार, शोभा दोंदे, गुड्डी फमिंदा, योगिता गायकवाड, माधुरी पाटील, सुवर्णा काळुंगे, श्रद्धा दुसाने, राणी गवळी, शोभा बांडे, शोभा दळवी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!